Author Topic: काय रे देवा.......... माझ्या भारताचे काय होणार ?????  (Read 7445 times)

Offline pran_kavi_007

  • Newbie
  • *
  • Posts: 5
[Note:- कविता वाचताना  संदीप खरेच्या “काय रे देवा” या कवितेचा ठेका अणि चाल मनात ठेवा..]
काय रे देवा.......... माझ्या भारताचे काय होणार ?????  :-\

काही दिवसांपूर्वी मनमोहन सरकारला २ वर्ष पूर्ण झाली।
५ वर्षही अशीच पूर्ण होणार !!!!!!
मग परत निवडणुका,त्यात मग अमाप पैसा( काला) आणि एकमेकांचे रुसवे फुगवे निघणार..
सामान्य माणूस हे सगळे बंद डोळ्यांनी बघणार  >:(
हे नेहेमीचेच  आहे अस म्हणून सोडून देणार..
 काय रे देवा......... माझ्या भारताचे काय होणार ?????  :(

मग कुणी एका राजकारणी वा पक्षाला सामान्य माणूस या शुल्लक गोष्टीची उगीचच चिंता,आस्था वाटणार
मग तो मीडिया ला बरोबर घेउन या विषयावर मोठी बोम्बा बोम्ब करणार
मग आमच्या संसदेत "महागाई" या विषयावर गरमा गरम चर्चा होणार
चर्चा संपताच पेट्रोल ३ आणि डीज़ल २ रुपयांनी ताबडतोब महागणार  :D !!!!!
सामान्य माणसाचे कंबरडे मोडणार,चर्चाच का झाली मग? यावर तो चर्चा करणार
काहीही न बोलता निमुटपणे सगळ  सहन करणार अणि आनंदाने/शिव्या देत का होइना पण पेट्रोल भरणार
काय रे देवा ......... माझ्या भारताचे काय होणार ????? || 1 ||

स्वातंत्रदिन,प्रजासत्ताकदीन याच दिवशी आमचे भारतावरचे देशप्रेम,जाज्वल्य आदर  तळपणार !!!
मग राजकारणी काय अणि आम्ही काय या दिवशी अगदी  कागदी झेंडे नाचवणार
दुसरयाच दिवशी ते झेंडे कचरा पेटीत असणार
आणि नंतर ते गटारी शेजारीच जाणार
या सगळ्याच आम्हाला काही काही नाही वाटणार
काय रे देवा...... माझ्या भारताचे काय होणार ?????  || 2 ||

(हेच राजकारणी खेळ/खेलाडू यांना पण नाही सोडणार)
आता आमचा सच्या!! हो अमचाच सच्या !!!!!!!
एकदिवसीय चेंडू-फळी सामन्यात द्विशतक झळकवणार
अणि इथे आमचे राजकारणी Is he महाराष्ट्रियन का इंडियन यावर राजकारण करणार
याच वेळी बहुतेक वेळी मीत भाषिक आमचा सच्या आय ऍम इंडियन फर्स्ट अस काहीसा बोलणार
आणि धगधगत्या अग्निकुंड--मधे “इती इंडियन’ अशी पूर्णाहुति मिळणार …
मग महाराष्ट्र भूषण काय आणि भारतरत्न काय याची राख होणार
सामान्य माणूस हळहळ व्यक्त करणार,सचिन आपला खेळतच राहणार…
आम्हीही मग निमुटपणे टीवी लावून त्याचा खेळ बघणार  !!!!
काय रे देवा........ ! माझ्या भारताचे काय होणार ???  || 3 ||

आज ४ अतिरेकी संसदेच्या जवळ पोहोचले
उद्या सगळी संसद्च अतिरेकिमय होणार
जसा अफझल गुरु बचावतोय तसाच कसाब ही फाशीपासून बचावणार
इथे सामान्य माणूस अतिसामान्य होणार….. राजकारणी लोकाना आयति शिकार मिळणार
५ वर्षानी मनमोहन सरकार बदलणार आणि "नविन रक्त" नावाखाली राहुल गाँधी येणार
बाकी सगळ तर सारखच राहणार …..
काय रे देवा.... माझ्या भारताचे काय होणार ?????? || 4 ||

(पण राज्यकर्त्यांनो एक लक्षात असु द्या)
भारतभूमिला स्वातंत्र मिळवून ६० वर्ष पूर्ण झालीत
जर हे असच चालत राहणार तर नक्की भारत परत पारतंतरयात जाणार (नाही)
……पण..... पण... पण...
तर ज्यांनी या साथी होतात्म्य पत्करले त्यांचे कष्ट वाया नाही जाऊ देणार
या आधीच आजचा तरुण वर्ग जागा होणार अणि माझ्या सारखाच एक सामान्य माणूस
तुम्हा सगळ्यांचे कंबरड सरळ करणार,
सुवर्ण स्वातंत्य दिनापर्यंत का होइना मी सिस्टम बदलण्याचा प्रयत्न करणार    || 5 ||

आता एवध सगळ वाचल्यावर काही लोक वा वा करणार, काही नुसताच विचार करणार
काही तल्या वाजवून निघून जाणार !!!!!!
पण खरच देवा या सामान्य माणसाचे डोळे नेमके कधी उघडणार....
काय रे देवा...माझ्या भारताचे नक्की काय होणार ??????  :(

आपलाच
कवी-प्रणव कुलकर्णी.



Offline Shambhuraje

  • Newbie
  • *
  • Posts: 3
खुप छान कविता.

Offline hanuman inamkar

  • Newbie
  • *
  • Posts: 16
पण खरच देवा या सामान्य माणसाचे डोळे नेमके कधी उघडणार....
काय रे देवा...माझ्या भारताचे नक्की काय होणार   

Offline anantkish

  • Newbie
  • *
  • Posts: 3
"तर ज्यांनी या साथी होतात्म्य पत्करले त्यांचे कष्ट वाया नाही जाऊ देणार
या आधीच आजचा तरुण वर्ग जागा होणार अणि माझ्या सारखाच एक सामान्य माणूस
तुम्हा सगळ्यांचे कंबरड सरळ करणार,
सुवर्ण स्वातंत्य दिनापर्यंत का होइना मी सिस्टम बदलण्याचा प्रयत्न करणार"

Ase ghadave ashi sadichha!!!

Offline pran_kavi_007

  • Newbie
  • *
  • Posts: 5

Offline ghodekarbharati

  • Jr. Member
  • **
  • Posts: 120
Khup sunder,  samanya manasane uchal ghetali tar kharech yanche kambarade modu.Keep it up
Pranav.Thanks a lot.

Offline mulayamitone

  • Newbie
  • *
  • Posts: 3


Offline gaurig

  • Full Member
  • ***
  • Posts: 983
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
पण खरच देवा या सामान्य माणसाचे डोळे नेमके कधी उघडणार....
काय रे देवा...माझ्या भारताचे नक्की काय होणार   

अगदि खरे आहे हे....
खुपच वास्तवदर्शि कविता आहे हि.....छानच....

Offline Nitesh Joshi

  • Newbie
  • *
  • Posts: 27
  • Gender: Male
Mastach re

Khara bharat ubha rahato dolyasamor

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):