मित्र/मैत्रिणींनो,
पॅच-अप, ब्रेक-अप पुन्हा पॅच-अप, ब्रेक-अप. मित्रांनो नवीन पिढीचे, तरुणाईचे, तरुण मुलंI-मुलींचे हे काय चाललंय ? कुठून हे फॅड, ही ऍड आणि हे याड त्यांच्या मनात भरलं गेलं ? कुठून त्यांनी हे पाहिलं ? हे सर्व ते कोणाकडून शिकले ? त्यांच्या मनात आणि डोक्यात कुणी हे भरवलं ? जास्त लांबण न लावता ऐकुया एक वास्तव-पॅच-अप, ब्रेक-अप ची, विनोदी-व्यंगात्मक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "पॅच-अप आणि ब्रेक-अप"
"पॅच-अप आणि ब्रेक-अप"
------------------------
काय झालंय आजच्या तरुणाईला ?
कालच झालायं दोघांचा ब्रेक-अप
आज होतोय पुन्हा पॅच-अप,
उद्या होईल का परत ब्रेक-अप ?
प्रेम म्हणजे यांना खेळ वाटला ?
प्रेमासाठी कुणीही साथीदार निवडला
आज एकावर जीव जडला,
तर उद्या तोच नकोस झाला.
पौगंडावस्थेतील त्यांचं हे वय
त्यांना प्रेमाची भाषा कळणार काय ?
एकीच्या बॉय-फ्रेंडने तिला सोडले,
तर दुसरीने त्याला वेळीच धरले.
हीर रांझा, लैला मजनू
फक्त इतिहासापुरतेच का जमा आहेत ?
ते अमर प्रेम कुठे गेले ?
प्रेमाचे हे भातुकलीचेच खेळ चाललेत !
एकावर प्रेम, तर दुसऱ्याबरोबर फिरणे
तिसऱ्याला वचने, तर चौथ्याला विवाह-स्वप्ने
हा नाही आवडला तर तो धर,
तो नाही आवडला तर हा धर.
कुणी आणले हे फॅड
ब्रेक-अपचे आणि पॅच-अपचे ?
हे खूळ लागले कुठून ?
तरुणाईला वाम-मार्गाने नेण्याचे !
याचा आदी आणि अंत काय ?
हे यांना नाही ठाऊक
या ब्रेक-अप आणि पॅच-अपच्या नादात,
यांना वाटतंय प्रेम नुसतेच घाऊक.
याचा शेवट व्हावयास हवा
मॅच्युरिटीचा यांच्यात शिरकाव व्हावा
त्यांनी त्यांचे भले स्वतः ओळखावे,
स्वतःच्या जीवनाचे हित पाहावे.
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.01.2023-गुरुवार.
=========================================