माझ्या भूतकाळात तुझं प्रेम
तुझ्या माझ्या जुन्या आठवणी मी मुदाम आठवतो
पाऊले जातात तिकडे मधेच मी वळणावर वळतो
मला तुला आठवायच नसत पण कल्पनेतील जग जरा खर वाटत
आता एकटा नाही मी ती आहे सोबतीला
माझ्यात तिला तू दिसशील याची भीती होती मला
काही नाही माझ्याकडे आता सुध्दा तरी ती आहे सोबतीला
पण संध्याकाळी एकदा तरी होते तू नसल्याची जाणीव
प्रेम तर ती खूप करते माझ्यावर
विसरत चालतोय तुला अस कधी तरी वाटत
गावी गेल्यावर ती शाळा ती बस तो रस्ता ती वाट आणि ते हरामी मित्र मैत्रीणी करता तुझी आठवण घट्ट
विचार येतात मनात आता तू असती तर
सोबत आहे जी ती समजून घेते मला
घालमेल माझ्या मनातला कळतो तिला
माझ्या चार ओळीतून तिला तूलाच सांगत होतो
बंद झाला आता लिहायचं कारण आता संसारात तिच्या सोबत मी पण दंग असतो
कधी कधी मुदाम चिडवत असे ती मला तुझ्या नावाने
माझ्या भूतकाळा सोबत तुला सुध्दा तिने समजून घेतले
स्वर तिचा घुमतो अख्या घरा
मंजुळ आवाज तिचा येतो माझ्या काना
तिच्या येण्याने घर बहरून आले पुन्हा पुन्हा
रोज सकाळी मला जागावी तिच्या सुंदर चेहऱ्यानि
आहो ऐकना आहो ऐकना
घराला स्वर्ग बनवि तिच्या त्या गोड वाणींनी
लेखक:-निखिल भडेकर