Author Topic: दुनियादारी  (Read 1698 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
दुनियादारी
« on: December 30, 2010, 09:34:28 PM »
IIओम साई II

दुनियादारी
जिथे जिभेचा वापर केला जातो,बनवून गोड सुरी,
जिथे नीचता होते सभ्यातेवर भारी,
जिथे प्रगती पथावरल्या  पायांवर आपलेच चालवतात आरी,
हीच त्या दुनियेची रीत,ज्याला म्हणतात दुनियादारी;

जी लोक दुःख देतात,तीच येतात सांत्वनास सारी,
डंका पिटतात दावा करून,हीच तर खरी यारी,
पाठ वळताच,हिणवतात जणू सात जन्माचे वैरी,
हीच त्या दुनियेची रीत,ज्याला म्हणतात दुनियादारी;

लहानपणीच शिकवण होते कि भाषा असावी दुधारी,
स्वार्थ साठी मात्र,नियत बनते विषारी,
मतलब साधल्यावर होतात एकमेकांचे आभारी ,
हीच त्या दुनियेची रीत,ज्याला म्हणतात दुनियादारी;

जिथे रक्षकच होतो विकावू,करण्यास गुन्हेगारी,
जिकडे फसवेगिरीचा धंदा चालतो बनून सुभेदारी,
जिकडे सरळ माणसावरच होते जबर दमदारी,
हीच त्या दुनियेची रीत,ज्याला म्हणतात दुनियादारी;

तोच फक्त ठरतो विजयी,जो असतो अहंकारी,
मूर्ख ठरतो तो,जो पुसतो निर्गुण निरंकारी,
सगळंच कसं गहन व चमत्कारी ,
हीच त्या दुनियेची रीत,ज्याला म्हणतात दुनियादारी;

खेळा सारख्या गोष्टींवर पैज लावतात व्यापारी,
हरण्यासाठी कारोडो रुपयांची लागते सुपारी,
खरच,वाटतात सगळे कसे नियतीचे भिकारी,
हीच त्या दुनियेची रीत,ज्याला म्हणतात दुनियादारी;

नौकरी करिता शिक्षणा पेक्षा लाच ठरते इमानदारी,
मंत्री कार्यभार विसरून होतात भ्रष्टाचारी,
प्रगती ऐवजी,ऐवजच चोरतात सांगून कार्य सरकारी,
हीच त्या दुनियेची रीत,ज्याला म्हणतात दुनियादारी;

पांगळा ठरतो प्रत्येक सभ्य,जो असतो परोपकारी,
भजनी रंगतो जो,त्याला नदवतात दाखवून सुगंधा सातारी,
मद्यपान सेवानाचीच,दावत खरी,ठरवतात बनून शिष्टाचारी,
हीच त्या दुनियेची रीत,ज्याला म्हणतात दुनियादारी;

डोळे का रे बंद तुझे,कुठे तू श्री रामा श्री हरी,
तूच का खरा,या मायावी जगाचा कैवारी,
कलियुगाच महिमा म्हणून ,प्रमाणपत्र  होतं जारी,
हीच त्या दुनियेची रीत,ज्याला म्हणतात दुनियादारी....!!!
चारुदत्त.अघोर.(दि,२८/९/१०)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline स्वप्नील वायचळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 182
  • Gender: Male
Re: दुनियादारी
« Reply #1 on: December 31, 2010, 11:35:21 AM »
chhan ahe...
aankhi post kara :) ;D
« Last Edit: December 31, 2010, 12:39:34 PM by स्वप्नील वायचळ »

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
तेरा अधिक दोन किती? (answer in English number):