II ओम साई II
कवी...एक प्रमाणित पागल.
जे अवघ्या जन मानसात,काही अंशीच असतात,
जे व्यवहारी व राजकारणी जगात क्वचितच वसतात,
जे शाब्दिक व्यायाम करून,प्रेरणात्मक काव्य कसतात,
पण त्याच कवींना,लोक किती सहज पागल ठरवून बसतात.
हेच ते कवी,ज्यांच्या पाझरणार्या जीवाला रडकं असं म्हणतात,
खरेतर हेच ते विद्यामजूर जे शब्दहीर्यांची खाण खणतात,
तेच जन जे ह्यांचाच स्फूर्ती काव्याने खळाळून हसतात,
पण त्याच कवींना,लोक किती सहज पागल ठरवून बसतात.
जे लोक कायम शारीरिक व मानसिक मानेने अपमानित होतात,
कारण आयुष्यातले अनमोल क्षण नेहेमी पैशानेच मोजतात,
अखेर कवीच्या काव्य स्फुर्तीनेच,स्वतःला जगात वसवतात,
पण त्याच कवींना,लोक किती सहज पागल ठरवून बसतात.
हेच कवी,एक एक भावना विणून,शब्द पंक्तींची जणू शालच विणतात,
अगणित जनांची मने एकवटून एक कवी जनम्तो,हे हो कुठे जाणतात;?,
हेच आपल्या काव्यांनी,पाषाण ह्रिदयी असो वा दगड,त्यांना पाझरून,त्यांचे अश्रूही पुसतात,
पण त्याच कवींना,लोक किती सहज पागल ठरवून बसतात.
ह्यांच्या स्फुरलेल्या एका शब्दांनी लोक रडतात तर एकानी खूलतात,
हर माणसाच्या मनात शिरूनही,हे स्वतःच्याच अस्तित्वात झुलतात,
काव्यरूपी आरसा दाखवून,प्रतीबिम्बवतात कि लोक कुठे फसतात,
पण त्याच कवींना,लोक किती सहज पागल ठरवून बसतात.
आपल्या काव्यानीच हे वाळवंटातही सृष्टी रंगवतात,
आसुर, शत्रूतही दैवत्व आणि मित्रत्व संगवतात,
दैवान्षित हे वेडे,अहो भावनिक जाण असल्यांनाच गवसतात,
पण त्याच कवींना,लोक किती सहज पागल ठरवून बसतात.
चारुदत्त अघोर.(दि.५/१/११)