II ओम साई II
लाच.
कधी पुण्यवान हि भारत भूमी,ज्याला म्हणायचे सर्वं महान,
वास्तविक्तेत पाहता,जिथे या युगात माणसाची बुद्धीच पडलीये गहाण;
जिथे नैतिक मूल्य होते कधी अजरामर,त्याच मूल्यांना पडलीये खाच,
कारण आता इथे श्वास घ्यायलाही कायम, द्यावी लागते लाच.
एक जिव जन्मवुया म्हंटल तर,तेहि परवाडायला आधी भरा गच्च खीसे,
ते भरवले तर, जन्मावेळी नोट खायला उभे डॉक्टर नावाचे गोंडस ससे;
खरच, त्या इवल्या जिवाला जन्मा आधीच चटकावी लागते दुनियेची आच;
कारण आता इथे श्वास घ्यायलाही कायम, द्यावी लागते लाच.
जन्मानंतर चांगली शाळा हवी म्हणून जमवा लाखोचं डोनेशन,
तेव्हांच कुठे चिमण्याला मिळते वेटिंग लिस्ट वर अडमिशन;
मिळताच दाखला,चालू अभ्यासाचं ओझं व शिस्तीचा जाच,
कारण आता इथे श्वास घ्यायलाही कायम, द्यावी लागते लाच.
करिअर व्हावे लेकराचे म्हणून,आई बाप खातात मन मारून खस्ता,
मुलगा वरती येण्याकरिता,परत ओता ट्युशन करिता पैशाचा बस्ता;
चमकदार आरस दुनियेत,पालकांना फक्त बोचते बजेटची काच,
कारण आता इथे श्वास घ्यायलाही कायम, द्यावी लागते लाच.
पुन्हा चिरंजीव तारुण्यात आले म्हणजे,त्यांचा सेटल्मेंटचा प्रश्न,
ते मात्र बेपर्वा गुलाबी स्वप्नात जसे राधिके समवेत कृष्ण;
ह्यांची स्पीडी लाईफ स्टाइल,पण बापाची चामडी झिझवायला नंगा नाच,
कारण आता इथे श्वास घ्यायलाही कायम, द्यावी लागते लाच.
चांगली लाईन मिळताच,प्रोमिसिंग करिअरला होते सुरवात,
दिवस रात्र एकवटून,लेकरू करतं मेहनत,जाळून जीवाची फुलवात;
रंगते मेहनत,आघाडीवर पोर म्हणून,द्या पार्टी ओली व पक्वान्न पाच,
कारण आता इथे श्वास घ्यायलाही कायम, द्यावी लागते लाच.
झटक्यात मोठी नौकरी मिळाली म्हणून,काळीज जातं परदेशी निघून,
माय बाप जड मनानी,निरोप देतात अश्रुन्वित नजरेनं बघून;
जशी त्या क्षणी अंगावर पडती नियतीची कुचल्णारी टाच,
कारण आता इथे श्वास घ्यायलाही कायम, द्यावी लागते लाच.
तिकडेच लेकरू मोठं होतं करून नेट वर लग्न,
आईची हळहळ,बापाची तळमळ,पण शिंग फुटलेलं लेकरू स्वत:तच मग्न;
खरं वाटत नाही माउलीला,मी ज्याला वाढवले तो खरच का हाच?,
कारण आता इथे श्वास घ्यायलाही कायम, द्यावी लागते लाच.
डॉलर कमावण्याच्या नशेत पालकांना चील्लरीचा भाव,
मध्यमवर्गीय माय बाप दबेल लेका पुढे बघून त्याच्या श्रीमंतीचा आव;
लहानुल्या आठवत्या पोराचा,चेहेरा दिसतो जीवघेणा नवाच,
कारण आता इथे श्वास घ्यायलाही कायम, द्यावी लागते लाच.
महिने,वर्ष सांजावतात,पण लेकाला नाही येत कसलीच आठवण,
वृधावस्थेत श्वास्तात दिवस,बघून फोटोंची साठवण;
चातकाची वाट बघती आई,येऊ का म्हणली तर उत्तर मिळतं कशाला उगाच?,
कारण आता इथे श्वास घ्यायलाही कायम, द्यावी लागते लाच.
हाता पायांचं काडं करून,पैसा कामावण्यातच जीवनाचा अस्त,
कारण पैसाच ठरतो महान व नैतिक मूल्य स्वस्तं;
तो आज येईल कि उद्या या आशेवरच प्रवास चालणार असाच,
कारण आता इथे श्वास घ्यायलाही कायम, द्यावी लागते लाच.
चारुदत्त अघोर.(दि.१४/१/११)