आता तरी देवा मला पावशील का? ह्या मराठी गाण्याच्या चालीवर विडंबन.
आता तरी बेवड्या दारू सोडशील का?
पानी ज्याला म्हणत्यात ते पिवशील का?
रामाच्या पारी तुझा गळा सुकतो.
गुत्त्याच्या रस्त्यावर तू चालतो.
चुळ जरा पाण्यानी भरशील का?
दारू नाही चहा जरा पिवशील का?
आता तरी बेवड्या दारू सोडशील का?
पानी ज्याला म्हणत्यात ते पिवशील का?
पहिल्या धारेची जेंव्हा तू मारतो.
रस्ता सोडून नाल्या मंदी पाय पडतो.
रात्री तरी घरी गुमान येशील का?
नाला सोडून गादी वर झोपशील का?
आता तरी बेवड्या दारू सोडशील का?
पानी ज्याला म्हणत्यात ते पिवशील का?
दारुनी या संसाराची केली होळी.
बायकोच्या नशिबी मोल मजुरी.
मुलांच्या फिया आता भरशील का?
शाळ मंदी त्यांना कधी धाडशील का?
आता तरी बेवड्या दारू सोडशील का?
पानी ज्याला म्हणत्यात ते पिवशील का?
खंब्यानी अशी तुझी वाट लावली.
आतड्यात अल्सरची गाठ फुटली.
दारू सोडून औषध आता घेशील का?
बायकोच कुंकू राखशील का?
आता तरी बेवड्या दारू सोडशील का?
पानी ज्याला म्हणत्यात ते पिवशील का?
केदार