Author Topic: आदर्श  (Read 2547 times)

Offline sanjaymane 1113

 • Newbie
 • *
 • Posts: 32
 • Gender: Male
आदर्श
« on: January 07, 2012, 07:14:49 PM »

हे शिवराया,
सह्याद्रीच्या कडेकपारीत  फिरून 
स्वराज्यावर  पहारा दिलास खरा ,
पण रेशनच धान्य खाऊन
आमच्यात एव्हढी ताकद कशी यायची  ?
नशीब रोप वे आहे म्हणून,
नाहीतर तुझी गाठभेट
फक्त पुस्तकातच व्हायची .
तुझं चरित्र वाचून
कधी कधी बाहुना  स्फुरण चढते,
पण "अहो नळाला पाणी आलंय" म्हणत
बायको हाती बादल्या देते.

साहेबाच्या आदेशाशिवाय
लेखणीही न चालविणारे कारकुंडे आम्ही,
तलवार काय चालविणार ?
तुझ्यासारखा बंडखोरपणा
आम्हाला नाही बुवा जमणार,
कारण मेलेलं मन हे
नोकरीच क्वालिफिकेशन आहे,
देशाची चिंता करत बसणे ,
ऑफिसच्या नियमांविरुद्ध आहे.

यवनांना  तलवारीच  पाणी पाजून ,
तू तुझं नाव अजरामर केलंस,
पण आम्हीही काही कच्च्या गुरुचे चेले नाही,
बघ प्रत्येक खडकावर
बदामाच्या आकारात ,
आमच्या प्रेयसींसह
आमची नावं आम्ही,
अजरामर करून ठेवलीत.

कवी---- संजय माने, श्रीवर्धन.

Marathi Kavita : मराठी कविता


anant nikam

 • Guest
Re: आदर्श
« Reply #1 on: March 02, 2012, 09:44:26 AM »
khup chaan aahet ajum he vichar ani kavita astil tar post kara

anant nikam

 • Guest
Re: आदर्श
« Reply #2 on: March 02, 2012, 09:44:55 AM »
NICE

amita,pune

 • Guest
Re: आदर्श
« Reply #3 on: April 02, 2012, 11:47:37 AM »
रोज मिळवा FREE फ्री मराठी SMS ज्यामध्ये
*प्रेमगीत SMS  :-*

*कविता SMS  :o

*चारोळ्या SMS  :P

*BEAUTY टिप्स  ::)

*LOVE टिप्स  ;)
*पुणेरी विनोद  :)

*ग्राफिटी SMS  8)

*सुविचार आणि
*उखाणे  ;D


यासाठी फक्त 1 SMS पाठवा

TYPE  करा:
JOIN <एक space>Prem_Geet

आणि पाठवा
"९८ ७० ८० ७०७० " या GOOGLE FREE SERVICE NUMBER वर ..

किंवा

या लिंक वर CLICK करा
http://labs.google.co.in/smschannels/subscribe/prem_Geet

ही SMS सेवा  सर्व MOBILE USERS साठी  FREE आहे

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: आदर्श
« Reply #4 on: April 05, 2012, 12:36:41 AM »
chaan.....kharach yawar vichr kela pahije