Author Topic: मी अभ्यास केला नाही ...  (Read 2847 times)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
मी अभ्यास केला नाही ...
« on: May 09, 2012, 05:49:27 PM »
रचनाकार संदीप खरे यांची माफी मागून त्यांच्या "मी मोर्चा नेला नाही ..."या गीताचे विडंबन


मी अभ्यास केला नाही, मी घोकंपट्टीही केली नाही
मी पुस्तकाला साधा हात सुद्धा लावलेला नाही
मी अभ्यास केला नाही, मी घोकंपट्टीही केली नाही
भवताली अभ्यास चाले तो विस्फारून बघताना
कुणी तोंडातून बडबडताना, कुणी मनातून घोकताना
मी दगड होऊनी बसलो मैदानावर जेव्हा
कुणी खेळायला देखील मजसोबत आले नाही
मी अभ्यास केला नाही, मी घोकंपट्टीही केली नाही
नेमस्त विद्यार्थी मी आहे, पुस्तक ज्ञान जिथल्या तिथे
सुट्टीत हिरवा झालो, परीक्षेत झाडली पाने
मग निकालातून कुठलीही, पास होण्याची चाहूल नाही
कुणी Grace दिला नाही, कधी पासही झालो नाही
मी अभ्यास केला नाही, मी घोकंपट्टीही केली नाही
नवेकोरे विषयाचे पुस्तक, नवीकोरी विषयाची वही
टेबलावर अजून रुळते, अदृश्य अभ्यासाची सावली
मी मुख्याध्यापकांना भ्यालो, मी सरांनाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही
मी अभ्यास केला नाही, मी घोकंपट्टीही केली नाही
मज जन्म पुस्तकाचा मिळता, मी हिंदी झालो असतो
मी असतो जर का वही, रफवही झालो असतो
मज वाचता वाचता कोणी रडले व हसले नाही
मी इतिहास झालो नाही गणितही झालो नाही
मी अभ्यास केला नाही, मी घोकंपट्टीही केली नाही
मी पुस्तकाला साधा हात सुद्धा लावलेला नाही

                           -प्रशांत नागरगोजे


follow my blog at www.prashu-mypoems.blogspot.com
« Last Edit: May 10, 2012, 11:20:44 AM by prashuN »

Marathi Kavita : मराठी कविता


PINKY BOBADE

 • Guest
Re: मी अभ्यास केला नाही ...
« Reply #1 on: May 14, 2012, 04:32:01 PM »
Kay he prashant

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: मी अभ्यास केला नाही ...
« Reply #2 on: May 14, 2012, 08:10:08 PM »
काय झालं पिंकी ?आवडलं  नाही ?

PINKY BOBADE

 • Guest
Re: मी अभ्यास केला नाही ...
« Reply #3 on: May 15, 2012, 10:14:24 AM »
Nahi re prashant,
tuji kavita kup chan aahe.......

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: मी अभ्यास केला नाही ...
« Reply #4 on: May 15, 2012, 02:54:06 PM »
धन्यवाद.... :).

तुमच्यासारखे रसिक भेटले तरच कविता लिहू वाटतात....