Author Topic: ओ बाजीराव  (Read 2688 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
ओ बाजीराव
« on: July 19, 2012, 12:19:45 PM »
शशांक,

तुझ्या "ओ बाजीराव" ह्या बाल कवितेवर हे विडंबन :'( .
मला माहित आहे तुला हे नक्की आवडेल.  :-[
 
 
  टकामका टकामका
बघता काय राव
पाळण्यातच  सुरु तुमचं
ह्यालो, हाय, बाय

घेता कडेवर कोणी तुम्हाला
हसताय कसे राव
बघून तुमची आवड ठेवलं
बाजीराव तुमचे नावं

काळेभोर डोळे तुमचे
तरतरीतसे  नाक
दिसणार मोठे होऊन तुम्ही
शहारुख सारखे स्मार्ट

बाळसेदार देह तुमचा
उंची ताडमाड
बघून गोबरे गाल ठेवलं
बाजीराव तुमचे नावं

बोळक्यातून  हसता कसे
ओ टकलू भॉय
पाळण्यातच दिसायला लागलेयत
आम्हाला तुमचे पाय

चळवळ किती पाळण्यात
तुमची, नर्स कडे धाव
बघून तुमची लक्षणं ठेवलं
बाजीराव तुमचे नावं :P
 
 
केदार....
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Re: ओ बाजीराव
« Reply #1 on: July 20, 2012, 09:01:45 AM »
केदार - अरे, फार भारी जमलंय हे विडंबन - खूपच आवडले मला.....

Offline Vaishali Sakat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 161
Re: ओ बाजीराव
« Reply #2 on: November 05, 2012, 12:38:34 PM »
Khupach Zhaan.......