Author Topic: सरकार  (Read 2224 times)

Offline Mangesh Kocharekar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 95
सरकार
« on: August 31, 2012, 03:38:58 PM »

    सरकार सरकार नावाची स्वार्थी कार
ज्यांना तुम्ही -आम्ही दिले अधिकार
त्यांचा आतबट्ट्याचा सारा व्यवहार
नात जोडण्यात नाफ्याचाच आधार
दुसर्यांना शिकवण्यात सदैव वाकबगार
ह्यांच्या बुडाखाली मिट्ट अंधार
त्यांच्या आदेशासाठी लोक तत्पर
त्यांच्या घरी दारी चमच्यांचा वावर
     हांच्या फोनचे बिल थकते
     कुणीतरी ते गुपचूप भरते
     त्यांना चुकून शिंक आली
       बदलत्या  हवेची चवकशी होते
       चुकून ते कधी  सभेत हसले
      त्यांच्या   विनोद बुद्धीचे  कौतुक होते   
याला कारण आम्हा मुर्खांचा जनाधार
त्यांनी मांडलाय मतांचा बाजार
  म्हणूनच जपून निवडा सरकार
कुणापुढे दमडीसाठी होऊ नका लाचार
                               कोचरेकर मंगेश       
       

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: सरकार
« Reply #1 on: September 02, 2012, 08:52:01 PM »
छान विचार आहेत...पण कविता "प्रेम कविता" या विषयात मोडत नाही. "इतर कविता" या भागात पोस्ट करावी. :)

Offline Mangesh Kocharekar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 95
Re: सरकार
« Reply #2 on: September 02, 2012, 09:11:51 PM »
This poem was supposed to be in "Vidamban"
But I posted it here by mistake...

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: सरकार
« Reply #3 on: September 03, 2012, 04:18:05 PM »
chan kavita...