Author Topic: पैसा तुम्हाला देईल काय?  (Read 2111 times)

Offline Tushar Kher

 • Jr. Member
 • **
 • Posts: 78
 • Gender: Male
  • हिन्दी रचनाएँ
पैसा तुम्हाला देईल काय?
« on: October 01, 2012, 10:53:58 PM »
पैसा पैसा करता काय?
पैसा तुम्हाला देईल काय?

अन्न विकत घेवू शकाल,
पण भूख विकत मिळेल काय?

गादी चादर मिळवून देईल
पण झोप विकत मिळेल काय?

औषधे जरी खरेदी केली
स्वास्थ्य तुम्हास देईल का?

पुस्तके विकत मिळू  शकतील
पण ज्ञान विकत मिळते का?

घर विकत घेता येईल
पण जिव्हाळा विकत मिळेल काय?

सुखाची साधने घेवू शकाल
पण सुख विकत मिळेल काय?

देवाची मुर्ती  विकत घ्याल,
पण भक्ती विकत मिळेल काय?

पैसा पैसा करता काय?
पैसा तुम्हाला देईल काय?

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: पैसा तुम्हाला देईल काय?
« Reply #1 on: October 03, 2012, 10:58:29 AM »
chan kavita

Offline Tushar Kher

 • Jr. Member
 • **
 • Posts: 78
 • Gender: Male
  • हिन्दी रचनाएँ
Re: पैसा तुम्हाला देईल काय?
« Reply #2 on: October 04, 2012, 10:25:30 AM »
Thanks.  :)