Author Topic: Why This kolavery ... Di कोल्हापुरी मर्द गडी मराठी Version  (Read 5100 times)

Offline बाळासाहेब तानवडे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 160
 • Gender: Male
 • जगा आणि जगू द्या...

Why This kolavery ... Di कोल्हापुरी मर्द गडी मराठी Version

मित्रांनो, मी हाय कोल्हापुरी , लई भारी.
चला वाजवा.
आम्ही कोल्हापूरी .. जगात भारी.मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी - ४ वेळा.

रांगड वागणं , बोलणं चालणं, शेलक शेलक बोलणं.
साध्या साध्या बोलण्या मधन , शिव्यांच ते पेरणं||१||

मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी – २ वेळा.

पायात चपल कर्रा कर्रा , फेट्याचा झुलतो तुर्रा.
तालमीत जाऊन बैठका मारून,शोभे पैलवान खर्रा||२||

मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी – २ वेळा.


मित्रानो , तुम्हाला वाटल नुसत्या गप्पा मारतोय....

गप्पा,गप्पा, गप्पा,गप्पा, नाहीत नुसत्या गप्पा.

पटलच आता.

आमचं बोलणं,चालणं,वागण पाहिलंत.
आता आमचा खाना आणि बाणा कसा तो बघा.

हुं ss तांबडा रस्सा... आमचं खाण बघा...

तांबडा रस्सा , पांढरा रस्सा वरपतो भुर्र भुर्र.
नाश्त्याला वडा , कट मिसळ आणि चहा फुर्र फुर्र.

नव नव रोज नव , हॉटेल देतंय चव.
खाव प्यावं द्यावं घ्याव , होतया मग नाव.

राजा शाहूच आमचं नात , नाही कुणा भीत.
चांगल्याशी चांगल वाईटाशी वाईट, हाय मराठा जात||३||

मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी - ४ वेळा.

कोल्हापुरी .. जगात भारी.


रचना व गायन : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ०६/१२/२०११
http://marathikavitablt.blogspot.com/


याचा यु ट्यूब (YouTube) Video उपलब्ध आहे.Please click below given link.
http://www.youtube.com/watch?v=482CpF1ZU9M&feature=share
« Last Edit: December 06, 2011, 07:24:28 PM by बाळासाहेब तानवडे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline shekhar.chhatre

 • Newbie
 • *
 • Posts: 1
लई भारी मराठी भाषा कुठेच कमी पडणार नाही असाच लिहीत जा मर्दा तुला भीती कशाची 

Offline बाळासाहेब तानवडे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 160
 • Gender: Male
 • जगा आणि जगू द्या...
खुप धन्यवाद.

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
lai bhari tanavde saheb...... kolhapuri mrdacha........ lai bhari...... shbd ani vidio donhi.....

Offline बाळासाहेब तानवडे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 160
 • Gender: Male
 • जगा आणि जगू द्या...
केदारजी,
आमच्या रांगड्या शब्दांच आणि बोलाचं कौतिक केल्याबद्दल ह्या जीवाला लई झ्याक वाटलं बघा.


Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422

Offline बाळासाहेब तानवडे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 160
 • Gender: Male
 • जगा आणि जगू द्या...
खूप धन्यवाद ज्योतीजी ...

rushikesh jadhav

 • Guest
he varjan dhnush la pathava ................................ to khush hoil he wachun

Offline बाळासाहेब तानवडे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 160
 • Gender: Male
 • जगा आणि जगू द्या...
Thanks....Rushikesh....

PINKY BOBADE

 • Guest
Fantastic......................