----------* कल्लोळ झाला पुरे *-----------

Started by Ambarish Deshpande, March 20, 2013, 09:05:02 PM

Previous topic - Next topic

Ambarish Deshpande

केला काय गुन्हा, मलाच न कळे, वाटे न सारे खरे
देतो आज पुन्हा कुणास कुठल्या, मुर्खास मी उत्तरे

नाही शुध्द इथे, कुणासही तरी, झालेत सारे कवी

आता बोलु नये, उगाच मी तरी, कल्लोळ झाला पुरे



जेथे ताल नसे, जीवंतही कसे, होइल ते काव्य रे
ठोके श्वास तुझे, लयीत असणे, आहेच कर्तव्य रे
जेव्हा भाव तुझे, लयीत भीनती, शब्दातुनि दिव्य रे
कोणा सांगु नये, समस्त बहीरे, कल्लोळ झाला पुरे


आहे  भाव जरी, धड्यापरी तरी, साहित्य होइल का?
हाती फ़क्त दिवा, तुझ्या म्हणुनि तो, आदित्य होईल का?
दृष्टी काव्य इथे कुणास न दिले, वरदान ते लाभले
सारे जाणुनही कुणीच न वळे, कल्लोळ झाला पुरे..

अंबरीष देशपांडे

मिलिंद कुंभारे


केदार मेहेंदळे

Ambrish ji

Kavita avadali. Hyacha reply mi aj post karin. Please take it sportingly. :)

केदार मेहेंदळे

#3
mitra

reply "prernadayi kavitet" post kela ahe. kavitech nav ahe "एकलव्यआम्ही " tujha abhipray apekshit ahe. :)

http://marathikavita.co.in/index.php/topic,11113.0.html

कवि - विजय सुर्यवंशी.

आहे  भाव जरी, धड्यापरी तरी, साहित्य होइल का?[/size]हाती फ़क्त दिवा, तुझ्या म्हणुनि तो, आदित्य होईल का?दृष्टी काव्य इथे कुणास न दिले, वरदान ते लाभलेसारे जाणुनही कुणीच न वळे, कल्लोळ झाला पुरे..


                             masatach........


rudra


shashaank

suparb - kuThale vrutt aahe he AmbareeSh ? shaardoolvikridit aahe kaa ?