लव्ह स्टोरी - भाग ३

Started by केदार मेहेंदळे, July 25, 2011, 10:16:44 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

http://marathikavita.co.in/index.php/topic,5716.0.html   लव्ह स्टोरी - भाग 1
http://marathikavita.co.in/index.php/topic,5732.0.html    लव्ह स्टोरी - भाग 2


लव्ह स्टोरी हि तीन भागातली कविता. भाग १, १९/७ ला पोस्ट केला ,  भाग २, २२/७ ला पोस्ट केला, आणि  आता शेवट..... एक प्रश्नानी......


बरेच दिवस मग मला घरातच कोंडून घेतल
दारूच्या नशेत स्वतःला पार बुडवून टाकल.
दहाव्या दिवशी तिचा फोन मी पुन्हा कट केला.
दुसर्या दिवशी मग ती स्वतः आली भेटायला.

हे शरीर नसलं तुझ्या साठी तरी मन exclusivly तुझच आहे.
मी अनेकांची राणी असले तरी माझा राजा तूच आहेस.
म्हतार शरीर वासना संपवेल, प्रेम मात्र चिरंतन टिकेल.
ह्या जन्मी हरलो राजा, पण पुढचा जन्म आपलाच असेल.

घेऊन जवळ मला तीही खूप रडली.
मला धीर देता देता तीही पार खचली.
बाहेर पावसानी धरणी ओली, आत अश्रूंनी डोळे.
जमीन तृप्त पावसानी, मात्र अश्रूंनी व्याकूळ माने.

बघून तडफड तिची, मीही जरा सावरलो.
तिला सावरण्या करता कुशीत तिच्या शिरलो.
पाऊस थांबला, कोरडी धरणी, पण प्रेमानी चिंब मने.
खर्या प्रेमाला न उरले आता देहाचे ही अडथळे.

आजही आम्ही बसनी बरोबरच येतो, शेजारी बसून.
तीही तशीच माझ्याशी बोलत असते मनापासून, हसून.
मनात मात्र माझ्या एकच विचार येतो...........
ह्याला   तिचं  निरागस प्रेम समजू   का माझा प्रेमभंग ?

कोणी ह्या प्रश्नाच कवितेतच उत्तर देईल का?

केदार ......
 

namratapatil

जो भाग तु २५/०७/११ ला  पोस्ट केला अणि एक प्रश्न विचारला त्याचे हे उतर:-

आजही तुम्ही बसनी बरोबरच येता, शेजारी बसून.
तीही तशीच तुज्यशी बोलत असते मनापासून, हसून.
मग का तुज्या मनात मात्र हा विचार येतो...........
ह्याला   तिचं  निरागस प्रेम समजाव  का तुजा प्रेमभंग ?

तीच शरीर जरी तूज नसल तरी मन तूज आहे
ती बाहेरून जरी कोना दुसरयाची असली तरी मनापासून ती फ़क्त तुजी आहे
खरच प्रेमाला फ़क्त देहाची गरज असते का
तिने निवडलेल्या या मार्गात तिला खर prem karayacha hakka नाही का

कोणताही माणूस स्वखुशीने वाईट मार्ग धरत नसतो
परीस्तीती त्याला तसा घडवत असते
कधीतरी तिला पुन्हा एकट गाठ
तिला हा मार्ग निवडण्याचं कारण विचार

तिने जर आधी तूला तिचे सत्य सांगितला नसतं
तर तिचं ते गुपित तुला कधी कळलं नसतं
तू तर तिच्यावर वेड्या सारखा prem करत बसला असता
आणि ती कुणा दुसर्याबरोबर रात्री रंग उधळत बसली असती

तिने तसं केलं नाही
आणि म्हणूनच तुला तिचं निरागस prem कळलं नाही
शरीर दुसर्याला देतानाही तिचं मन फक्त तुज्यात होत दंग
तू कसा विचार करू शकतोस कि ती  करेल तुजा prem भंग

Nitesh Joshi

LAY BHARI


mst kavitela kavitetunach mst uttar

LAY LAY BHARI :)

sharad raje

मी नम्रताच्या मताशी सहमत आहे
जरी ती तुझी होवू शकत नसली
तरी मनाने फ़क्त तुझीच आहे
कारण तिचं मन स्वच्छ आहे
तु नशिबवान आहेस मित्रा
ती तुझ्याशि खरं बोलली
नाहीतर माझं नशीब
जो मी अजूनपण समजू नाही शकलो
की तिला माज्याकडून नक्की काय हवं होतं
प्रेम,पैसा की फक्त शारिरीक सुख.......

jayashri321

खर्‍या प्रेमाला न उरले शरीराचे अडथळे अस म्हणतोस..
तिच्या मनात काय आहे तेही जाणतोस,
ती मनाने तुझीच राहील नेहमीच हे मानतोस ना???
मग तरी हा प्रेमभंग ..अस प्रश्न का विचारतोस??
हा प्रेमभंग नाही..
हे तर जिव्हाळ्याचे ते धागे आहेत,
आयुष्यभर सोबत करणारे..
कधी न तुटणारे..
शरीराने जुडलेली बंधन तुटतात कधी कधी..
पण मनाची दोर कशी तुटेल???
भलेही या जन्मात नसाल कायम सोबत..
पण एक सुंदर नातं..
ते या सगळ्यापेक्षा जास्त उंच आहे नाही का???

amolkash

Masta Lihilay......khupach chhaan!!!!!!!!!!!!!!

From: Amol Kashelkar

manoj vaichale

खर्‍या प्रेमाला न उरले शरीराचे अडथळे अस म्हणतोस..
तिच्या मनात काय आहे तेही जाणतोस,
ती मनाने तुझीच राहील नेहमीच हे मानतोस ना???
मग तरी हा प्रेमभंग ..अस प्रश्न का विचारतोस??
हा प्रेमभंग नाही..
हे तर जिव्हाळ्याचे ते धागे आहेत,
आयुष्यभर सोबत करणारे..
कधी न तुटणारे..
शरीराने जुडलेली बंधन तुटतात कधी कधी..
पण मनाची दोर कशी तुटेल???
भलेही या जन्मात नसाल कायम सोबत..
पण एक सुंदर नातं..
ते या सगळ्यापेक्षा जास्त उंच आहे नाही का???


mahendra khadse

Sharirane kelely Pream kadhi hi Bangh ho u Shakte Parntu
Je Pream Manane Kele Jate TeCh Khare Pream Aahe
Ani Nashibvan Lokanach Aas Khar Prem Milte .