।।त्सुनामी ।।
ते सारे लोक राहत होते सुखाने ,
सागर तीराचे जीवन जगत होते आनंदाने ।।
समुद्र हा पिता होता हो त्यांच्या सोबती ,
सहवासात त्याच्या कसली नव्हती भीती ।।
पहाटेची गोड स्वप्न पाहत होती भविष्याची ,
चाहुल नव्हती त्यांना येणाय्रा अनिष्ठांची ।।
लाटांच्या नादाने होत सुरूवात दिवसाची ,
गार वारा किणाय्राचा घेत भेट गळ्याची ।।
तालात असता लाटा बेसुर आज का झाल्या ,
घेऊण अनिष्ठ संगे तांडव करत आल्या ।।
पित्याचे विद्रोही रूप त्यांनी पाहिले ,
होते नव्हते सारे त्याचे पाण्यात वाहिले ।।
गार वारा किणाय्राचा का मंद आज झाला ,
भेट घेण्या ऐवजी अश्रु देऊण गेला ।।
आयुष्याच्या वाटेवर काय आता करायचे ,
जगायचे मरायचे कि , विलुप्त व्हायचे ।।
दैवाच्या विधीला का डरायचे ,
उत्साहाने होडी पुन्हा सागरात न्यायची दुर्दैवी नशीबावर कर्त्तत्वाने मात करायची ।।
।। हर्षता भाईदास सैंदाने ।।