कारण ती आलीच नाही - Part1

Started by Rupesh Naik, November 06, 2011, 11:28:00 AM

Previous topic - Next topic

Rupesh Naik

Please Read Poem Till The End...
You will love it...I assure you..
...,,कारण ती आलीच नाही
                                      रुपेश नाईक

सांज सरता सरता रात्र झाली
मनातील हुरहूर दाट झाली
भीतीनेही काळजात साद दिली
कारण ती आज नाही आली


न भेटता हि ती शंभरदा भेटते
न बोलताही शंभर गुज बोलते
तरीही अंतरात आर्त हाक दाटली 
कारण ती आज नाही आली


मी तिच्यावर इतके प्रेम करतो
ती देखील माझ्यावर तितकेच का करते ?
तरीही ग्वाही देण्यास कोणी नाही
कारण आज ती आली नाही

Flashback............
आजही आठवते ती पहिली भेट
मी हसण्याच्या प्रयत्नात पण तू निघून गेलीस थेट
मी देखील तसा जिद्दी स्वभावाचा
रोज smile देण्याचा उचलला मी वसा
साप्ताह नंतर यश पदरात आले
जेव्हां तिचे "Hii" शब्द कानावर पडले...

"मी?" म्हणून मी साद दिला
तर "तूच" म्हणून प्रतिसाद आला
प्रश्न आला "आपण ओळखतो?"
"अग ओळखावेस म्हणून रोज तर हसतो!!"

नावावरून हाकलेली मग आमची नाव
अखेर तिने गाठला मैत्रीचा गाव
Coffee च्या वाफेत मग मनही तरंगले
तिच्या गप्पांत आपले स्वत्वच हरपले   

श्रावणाचा पाउस मन भिजवत होता
इंद्रधनुच्या रंगाने मैत्री सजावत होता
रात्रीचे call rates कमी होते झाले
Inverse proportion ने फोन वाढत गेले


मैत्रीच्या पावसात प्रेम अंकुरित होते
तिथेही असेच होते का म्हणून डोकावत होते
विचार शक्तीचा अंत होता..
अभ्यासही जरा मंद होता..

या मुली स्पष्ठ काही सांगत नाही..
सांगाव तर तास त्यांना मुळीच आवडत नाही..
१ एप्रिलला ठरवले आता प्रपोज करावे
नकारच आला तर एप्रिलफुल म्हणावे

दहा phone  केले एकही नाही उचलला
प्रपोजच्या  नादात   माझाच एप्रिल फुल होऊन बसला   
"एक विचारू" म्हणून केली सुरवात
"तुला जीवनसाथी कसा हवा?" वर समाप्त
"अगदी तुझ्यासारखा" उत्तर होते अपेक्षित
शाहरुख सारखा उत्तरल्या आमच्य माधुरी दीक्षित

मला तुझा फोन नाही आला तर कसबस वाटत
चिंतेने काळजात काहूर माजून आभाळ मनात दाटत
तू समोर असावी म्हणून मी झटतो
काहीतरी कारण काढून मग तुला भेटतो

मित्रांबरोबर असलो तरी वेध तुझेच असतात
मजनू देवदासच्या नावाने तेही मग घेरतात
तुझ  हसण तुझ बोलण सर्व मग आठवत
मित्रांसोबत असूनही विश्व माझ पालटत



प्रेम काय ते म्हणतात ते हेच का आहे?
नाही रे वेड्या  हा तुझ्या मनाचा खेळ आहे
तुझ्या भावना मी समजू शकते पण प्रेम नाही
कारण मी तुला त्या नजरेने कधीच पाहिले नाही

guilty वाटतय मला तू माझा बेस्ट friend आहेस
माझी चूक कोठे झाली ते मी  शोधते आहे
खिन्न मनाने घरी परतलो
सुन्न मनाने झोपी गेलो
स्वप्नातही तिने माझा पाठलाग केला
sad songs ने मग सूरच धरला

Friendship day च्या दिवशी मग फोन आला
मैत्रीचा विरह म्हणे सहन नाही झाला
नात्यापेक्षा मी व्यक्तीला महत्त्व देते
Friend जरी तुझी मी girlfriend म्हणून येते
Three magical words चा मग स्वीकार झाला
Friendship day च्या दिवशी valentine साजरा केला

आपल्या Love story मध्ये एक प्रोब्लेम आहे
तू क्षत्रिय तर मी ब्राम्हण आहे
जातीभेद गेला तरी भेद मानले जातात
प्रेमियांच्या जीवनात व्याधी बनून येतात
आई बाबांना दुःख देवून  मी नाही येणार
अन क्षत्रियांचा जावई त्यांना नाही चालणार

"कस होणार रे आपलं?"प्रश्न तिला पडलेला
उत्तराच्या शोधात प्रश्नही फार थिजलेला
भातुकलीचा आपला डाव असाच मोडेल का रे ?
आपलीही प्रेम कहाणी अधुरीच राहील का रे ?
हळव्या दुःखी मनाने ती हि मग जवळ येते
कधीच दूर होऊ नये म्हणून मिठी मात्र घट्ट होते


मनातल्या यातना डोळ्यात मग उतरतात
गुलाबी गालावरून दवबिंदू ओघळतात
सुन्न होऊन सारे निशब्ध श्वास उरतात
शब्द मुके होऊन नजरा फक्त बोलतात
हातातील हाथ देखील वचनबद्ध होतात
रेशमाच्या बंधात मंगलाष्टके गातात
हळव्या मनाने मग हळुवार हाथ सुटतात
चातकापरी दुसरया  भेटीची वाट पाहतात

समाजाच्या चौकटीत चौकात बांधली जाते
दुसरया भेटीची तारीखही मग उलटून जाते
आसावलेल्या नजरा भेटीसाठी अतूरतात
असह्य वेदनापरी   नशिबावर त्या रुसतात


त्या वचन दिलेल्या स्थळी अजूनही वाट पाहतोय मी
तू आज नक्की येशील मनाची खोटीच समजूत काढतोय मी
शब्दांची तुझ्या उगाच उजळणी करतोय
तू दिलेली भेट मग हृदयाशी धरतोय.
लुकलुकणाऱ्या डोळ्यांची उघड झाप जाणवते
प्रत्येक श्वासागणिक तू जवळ वावरते


समाजाची आप्तांची सर्व बंधने झुगारून ये
गमावलेल्या श्वासास या श्वास हा मिळवून दे

ती आज आली नाही अन कधीच येणार नाही
कितीही वाट पहिली जरी
विरहाची हि घटी संपली नाही
अन कधीच संपणार नाही..... :( ...समाप्त

Pls reply and guide me....



कारण ती आलीच नाही -  Part 2 http://marathikavita.co.in/index.php/topic,6673.0.html


Rupesh Naik


athang

Flashback............
आजही आठवते ती पहिली भेट
मी हसण्याच्या प्रयत्नात पण तू निघून गेलीस थेट
मी देखील तसा जिद्दी स्वभावाचा
रोज smile देण्याचा उचलला मी वसा
साप्ताह नंतर यश पदरात आले
जेव्हां तिचे "Hii" शब्द कानावर पडले...

GOOD YAAR !!!!!

Rupesh Naik


केदार मेहेंदळे

Hi Rupesh,

Kavita khup avdli. Pan kadhi kadhi mothi kavita koni madhech vachaych sodun deu shkto. ani hyat chuk kahi nahi. ha fast cha jmana aahe. tv serials madhe suddha aplyala sgl brek ghetch phaychi savy ahe. maan ekach goshtivr khup vel swsth bast nahi.

Hi tika nahi. Tu guide krayla sangitls mhnun ek sugetion detoy. Ashi mothi kavita 2 kinwa 3 bhagat post karat ja ani prtyek bhagat link de. tyach brobr yogy thikani brek de mhnje utsukta tikun rahil. Mi maji "love Story" hi kavitahi 3 bhagat post keli hoti. Ajun ek. mothi kavita lihitos mhnje tu goshti velhal asnar ani tu lekh/ katha suddha lihu shkshil praytn kar.

Any way... pan kavita khup chan ahe.... mla avdle.

Rupesh Naik

To Kedar,
      First of all I appreciate your Suggestions, and i am totally agree with you. hence after i will keep this in mind.
      Thanking you

santoshi.world

superbbbbbbbbbbbb ........... solid ................... I like it very much ......... keep writing and keep posting :)


I feel kavitela kasalehi bandhan nasave ............. mala hi kavita ekach bhagat vachayala avadali ........ coz kavita ardhavat naslyamule madhyech mazi link tutali nahi .......... ani start to end mi guntun geli hoti kavitet ......


tashya saglyach oli mast ahet pan hya vishesh avadalya ........ :)
Friendship day च्या दिवशी मग फोन आला[/size]मैत्रीचा विरह म्हणे सहन नाही झालानात्यापेक्षा मी व्यक्तीला महत्त्व देतेFriend जरी तुझी मी girlfriend म्हणून येते Three magical words चा मग स्वीकार झाला Friendship day च्या दिवशी valentine साजरा केला"कस होणार रे आपलं?"प्रश्न तिला पडलेलाउत्तराच्या शोधात प्रश्नही फार थिजलेला भातुकलीचा आपला डाव असाच मोडेल का रे ?आपलीही प्रेम कहाणी अधुरीच राहील का रे ?हळव्या दुःखी मनाने ती हि मग जवळ येतेकधीच दूर होऊ नये म्हणून मिठी मात्र घट्ट होते

Priyanka Jadhav


manoj vaichale