संन्याशाची कथा (गमन)

Started by केदार मेहेंदळे, March 19, 2012, 11:47:03 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

व्यभिचारी अन संन्यासी 
मेले अन गेले स्वर्गासी
व्यभिचारी रडे दुख्खानी
संन्यासी हसे आनंदानी

घेऊन जवळ रडणाऱ्या
देव म्हणे सांग बाळा
रोगग्रस्त शरीर  तुझे
सोडता का दुख्ख तुला?

बोलला चिडून व्यभिचारी
का बोलावलेस मजसी ?
होते किती भोगण्यासी
आनंद अजून मजसी

पुरवली आवड रसनेची
सेवून तांबुल मदिरा मी
सुखवीण्या  इंद्रिय सर्वही
भोगल्या किती मी नारी

कधी हरलो मी जुगारी
कधी लुटले मी इतरांसी
वापरून दिलेल्या इंद्रियांसी
उपभोगले मी जीवनासी

जे दिलेस ते वापरले
शेवटी न काही उरवले
चल दे आता भोगण्या
नरजन्म मजला पुन्हारे

व्यभिचार्याचे ऐकुनी बोलं
देव हळूच हसून गालात
पाहून विचारे संन्याशास
सांग तू, तुझे काय?

राहिलो मी देवा जपून
ना केले कुठलेही छंद
राखली सर्वही इंद्रिय
केले ना कुठलेही शौक

जे दिलेस ते उरवले
भोगात ना कधी वापरले
मारून इंद्रियांना सतत
भोगात ना शरीर बुडवले

ऐकता संन्याशाचे बोलं
बोलला देव चिडून
तू कपाळ करंटा खरच
तुजला ना सुखाची जाणं

जे दिले मी तुला प्रेमाने
तू घालवले वाया रे
किंमत ना तुज दानाची
ना गरज तुला इंद्रियांची

बोलून असे देवानी
दिले सर्वही व्यभिचार्यासी
अन पाठवले दोघांसी
नर जन्म पुन्हा घेण्यासी

तक्षणी भिकारिणी पोटी
जन्मला विकलांग संन्यासी
आठवूनी संवाद देवाचा
रडला तो टाहो फोडोनी


केदार...
(माझ्या "गमन" ह्या संग्रहातून)

रांग चालली (गमन)

http://marathikavita.co.in/index.php/topic,7986.msg25585.html#msg25585


दिवस आता बदलत चाललेयत (गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,7818.0.html

अनिल पाखरे

संन्याशाची कथा (मनन)

व्यभिचारी अन संन्यासी 
जन्मले अन आले पृथ्वीसी
व्यभिचारी रडे दुख्खानी
संन्यासी हसे आनंदानी

पाहुनी सर्व देव हसे
जानी तो सर्व मनातले
का हसे संन्यासी दुःखात
का रडे व्यभिचारी आनंदात

बोलला रडत व्यभिचारी
जे दिलेस ते वापरले
शेवटी न काही उरवले
भोगुनी ब्राम्हन्द्सुख अतृप्तच

हसे संन्यासी दुःखात
ज्यासी नसे शरीरसुखाची जान
त्यासी का चिंता विकलांगतेची
नाम देवाचेच ब्राम्हन्द्सुख

देवास प्रिय आपुली सर्व लेकरे
अल्लड काही ज्ञानी काही
ज्यास जान खऱ्या सुखाची
तोच खरा सुखी सर्वदा

कृपया आपल्यास देवाने दिलेल्या कलेचा उचित वापर करा.
कमीत कमी दुसऱ्यास भरकटऊ  नका.....

केदार मेहेंदळे

क्षमा मागून......

कलेला  उचित  अनुचित  ठरवू  नका
दुसर्याचे  विचार  चुकीचे  न  म्हणता
स्वताचे  विचार  लिहायला  लागा

जे चूक असत तेच
ओरडून सांगायला लागत
म्हणून सत्त्यच  नेहमी जिंकत
असं ओरडायला लागत.

सूर्य उगवला हे सांगायला नाही लागत
चंद्र सुंदर दिसतो हे बोलायला नाही लागत
पटलेलं बोलायची इच्हां नसते म्हणून
नीती अनीती बद्दल बोलाव वाटत

सुरवातच  केली  आहे  तर
आणखी  एक  गोष्ट  ऐका
Guest न रहाता
login करून  कविता  पोस्ट  करा .

पुन्हा क्षमस्व.... मी माझ्या गमन ह्या काव्य संग्रहात मरण, पुनर जन्म, मुक्ती ह्या कल्पनांना थोड ट्विस्ट केल आहे. त्यातली मजा घ्यां. कृपया त्यात पाप पुण्य, नीती अनीती आणू नका.  तुम्ही केलेल्या coment वरून हे समजलो कि तुम्ही माझी कविता मना पासून पूर्ण वाचली आहे. त्या बद्दल धन्यवाद. तुमची कविता हि आवडली. ...... असाच लोभ ठेवा.