रांग चालली (गमन)

Started by केदार मेहेंदळे, March 26, 2012, 01:36:57 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

रांग चालली अव्याहत हि
जन्मा येउनी मृत्यू साठी
मिळता तिकीट मृत्यूचे मग
निघण्या पुढील प्रवासाशी

जन्मा येउनी रांग लावणे
रांगे बरोबर चालत रहाणे
कोणीही ना यांतून सुटले
रांग म्हणजे जीवन जगणे

जो जन्माला तो आला येथे
जो आला तो रामाला येथे
उभे रांगेतच इथे सर्वही
आप्त स्वकीय मित्रांसंगे

रांग जरी हि इतकी मोठी
तिकीटाची ना घाई कुणाही
उभे रांगेतच जरी सर्वही
रांग दिसेना परी डोळ्यासी

रांग वाढली जरी कितीही
मिळणार तिकीट प्रत्येकासी
बंद होतेना तिकीट खिडकी
अखंड चालू  दिवस रात्री

रांगेतुनी ना कुणी सुटला
जरी कंटाळला वा थकला
नियम परी रांगेचे ह्या
कोणीही ना कधी समजला

या रांगेचे नियम वेगळे
पुढे कुणी ना कुणीच मागे
नंबर कळे ना जरी कोणाते
तिकीट तयार असे सर्वांचे

पुढे जाणे ना आपल्या हाती
रांग ना थांबे कुणाही साठी
रद्द तिकीट ना झाले कधीही
मिळता तिकीट ना थांबले कोणी

कोणी थकला वाट पाहून
खितपत पडला वर्षानुवर्ष
मिळता परी तिकीट अचानक
निघून गेला सोडून आप्त

जरी तिकीट तयार सर्वांचे
ना ठावे मिळणार कधी ते
चालत नाहीत सत्ता वशिले
तिकीट मिळता लगेच निघणे

रांगेत चालले खेळ कितीक
कमावणे अन गमावणे इथेच
मिळता तिकीट जाणे सोडून
देह, दैव अन प्रारब्ध इथेच

इथे मिळवूनी इथेच सोडणे
प्रवासात ना काहीच नेणे
देहासही या सोडून येथे
प्रवासात या नागडेच जाणे

परी विसरुनी नियम येथला
धडपड चाले काही कमवण्या
आप्त, मित्र, परिवार गोतावळा
पैसा, संपत्ती आणिक सत्ता

रांगेतील हे सर्व प्रवासी
विसर त्यांना मृत्यूचा अंतरी
जीवनाच्या या स्टेशन वरती
थांबले घेण्या घडीभर विश्रांती

रांग चालली अव्याहत हि
जन्मा येउनी मृत्यू साठी



केदार...
(माझ्या "गमन" ह्या संग्रहातून)

मी वाट बघतोय... (गमन)

http://marathikavita.co.in/index.php/topic,8055.msg25936.html#msg25936


संन्याशाची कथा (गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,7885.0.html

Rohit Dhage

Jiwanacha rangeshi chan compare kelai.. Good1