तपश्चर्या (गमन)

Started by केदार मेहेंदळे, May 14, 2012, 12:57:09 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

मी ऑफिस साठी रोज कुर्ला स्टेशनवर उतरतो. रोज उतरल्यावर मला पलीकडच्या ब्रिज वरून एका मुलीचा "या अल्ला, या अल्ला" असा आवाज यायचा. सकाळ, दुपार, रात्र. मी कधीही स्टेशनवर गेलो तरी तिचा आवाज येतच असे. बहुतेक  पलीकडच्या ब्रिजवर एखादी लहान मुलगी भिक मागत असावी. त्या आवाजांनी मी  अस्वस्थ व्हायचो. दिवसभर "या अल्ला, या अल्ला"  म्हणून ती मुलगी दमत नसेल? किती मोठी असेल? तिला काय खायला मिळत असेल? असे अनेक प्रश्न माझ्या मनात येऊन मी अस्वस्थ होत असे. पण जाऊन त्या मुलीला बघण्या साठी मी कधी प्रयत्न केलाच नाही. त्या मुलीवरून मला सुचलेली हि कविता आहे. परंतु आपल्या हिंदू धर्मातील कल्पनान नुसार कवितेत "योगी" अन "राम राम" असे घातले आहे.

स्टेशन वरचा वेडा भिकारी
राम राम म्हणे दिवस रात्री
खाण्याचेही भान न त्यासी
कपड्यांची ना शुध्द जराही

वेडात करे एकच हाकाटी
राम राम रामचं पुकारी
बाजूस त्याच्या धावते गर्दी
त्याला परी ना कसली घाई

आज सकाळी स्टेशन वरती
मरून पडला तो भिकारी
पाहून कुणी मनी हळहळे
कुणी लावती रुमाल नाकी

घेत असेल राम नाम
मिळण्या भिक पोटभर
होता रात्र असेल पडत
जाऊन दारुच्या गुत्यावर?

झोपला असेल काल रात्री
करून रोजचा नशा पाणी
होऊनी विषबाधा दारुतुनी
मेला असेल झोपेत रात्री?

का गतं जन्मीचा  भ्रष्ट योगी
असेल जन्मला भिकार्या पोटी?
करण्या त्याची तपश्चर्या पुरी
राहिली अधुरी जी गतजन्मी?

करत असेल घोर तपासी
मनुष्य प्राण्यांच्या या अरण्यी
होता पूर्ण तपश्चर्या त्याची
झाला मुक्त त्यागुनी देहासी?

मेला आहे स्टेशन वरती
दारू पिऊन कुणी भिकारी
का मुक्त झाला आहे
त्यागुनी देह कुणी तपस्वी?

बरेच दिवस झाले त्या मुलीचा आवाज येत नाहीये. ??

केदार...
  कोणी तरी असतंतिथ. (गमन)
  http://marathikavita.co.in/index.php?action=post;msg=28159;topic=8570.0



खरी मुक्ती (गमन)

http://marathikavita.co.in/index.php/topic,8458.0.html

प्रशांत नागरगोजे

कल्पना छान आहे....

balrambhosle


केदार मेहेंदळे