खरी मुक्ती (गमन)

Started by केदार मेहेंदळे, May 07, 2012, 10:50:39 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 
जन्मल्या पासून मागतच राहिले
प्रत्येकजण काही ना काही, माझ्या कडे.
आई, वडील, सखे सोयरे, बायको मुलं.
अन मी वाहतच राहिलो त्यांच्या अपेक्षांचे ओझे
माझ्या दुर्बळ खांद्यांवर

म्हणूनच आनंदानी हा देह झुगारून
बनून पडलो होतो जड शिळा
एका उजाड माळरानावर.
उन, वारा, पावसाचा मारा झेलत,
पण, अपेक्षांच्या भारातून मुक्त,
आनंदानी.... युगानुयुग.

अचानक कोणा रामानी
बुड टेकल माझ्यावर घटकाभर.
मी दगडच राहिलो, पण,
तेंव्हापासून रांगच लागलीय
काहीना काही  मागणार्यांची
माझ्या समोर, दिवस रात्र.
अन मी चाललोय दबून
त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्या खाली.

फुटून जाईन एकदिवस
त्या अपेक्षांच्या ओझ्या खाली दबून.
अन माती बनून उडीन दशदिशांना,
अन संपून जाईल माझं अस्तित्व हवेतच.
तिच असेल का खरी मुक्ती???


केदार...
(माझ्या "गमन" ह्या संग्रहातून)
 तपश्चर्या (गमन)
  http://marathikavita.co.in/index.php/topic,8539.0.html



कोंबडी गेली जीवानिशी (गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,8408.0.html