अमीर ची कार्य शाळा

Started by केदार मेहेंदळे, May 22, 2012, 11:13:49 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

आज बघा आक्रीत घडले
जमवले आमिरने मुलांस
जमवून म्हणे बघुदे मला
ओरडता किती जोरांत?

मुलेच ती, ओरडली जोरांत
आमिरही दचकला खास
म्हणे असेच ओरडा मुलांनो
स्पर्शता  कुणीही शरिरास

ओरडून जा पळून दूर
लपून बसा आडोशास
ऐकून मुले हसली आणि
हसले पालकही खास

कापतील आता हात मोठ्यांचे
घेताना जवळ मुलांना
बसवता मांडीवर बाप मुलीला
ओरडेल तीही जोरात

पडतील चेहरे काळे जेंव्हा
घेतील नातलगान वरही  संशय.
हसलेल्या पालकांचे दात तेंव्हा
जातील त्यांच्याच घशात   :'(


केदार....


सत्य मेव जयते
http://marathikavita.co.in/index.php/topic,8768.0.html

जपून जरा मित्रा शहारुख
http://marathikavita.co.in/index.php/topic,8598.0.html
नावांत काय?
  http://marathikavita.co.in/index.php/topic,8911.0.html