मैत्रीण (गमन)

Started by केदार मेहेंदळे, July 09, 2012, 02:29:42 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

पाहिलं पाउल टाकल्या पासून
मी (सावली) तुझी मैत्रीण झाले
मित्र मैत्रीण खूप मिळाले तुला
मी मात्र तुझीच राहिले

खेळायला लागलास अंगणात तेंव्हा
मीही तुझ्या बरोबर खेळले
चालायला लागलास रस्त्यात तेंव्हा
मीही तुझ्या बरोबर चालले

तू मात्र तुझ्याच नादात
पुढे पुढे जात राहिलास
मला मात्र मागे पुढे
कधी पायात तुडवत राहिलास

उन्हातून तू चालत असता
मीच तुझी साथ केली
आडोसा परी मिळता तुला
तूच माझी साथ सोडली

दमत होते मीही तरी
तुला ना ते कधी कळले
तुझे प्रेमाचे दोन शब्दही
नाही माझ्या नशिबी आले

साथ तरीही तुझी सोडायची  न्हवती
पण लोकंही मला विसरले
तुला खांद्यावर घेऊन गेले
मी मात्र अशीच संपले!!!!!!!

केदार...
  दोन पाने(गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,9098.0.html



धनुष्य मिळेल का? (गमन)

http://marathikavita.co.in/index.php/topic,8993.msg29545.html#msg29545

sylvieh309@gmail.com




SWAPNIL CHILE

KADHI KADHI ASACH HOT
BOLAYCH TE RAHUN JAT
BOLTABOLTA PAPANYANMADHAL
PAANI MATRA VAHGUN JAT

PANGALICHE DIVAS YETAT
PAN PAN GALUN JAT
PUNHA NAVYA KOMBASATHI ZAD MATRA
ZURAT RAHT

SWAPNIL CHILE[/color]

केदार मेहेंदळे