दोन पाने(गमन)

Started by केदार मेहेंदळे, July 16, 2012, 10:36:31 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

वेली वरची पाने दोन
एक हिरवे
पिवळे एक

झाली सकाळ पडले उन्ह
एक हसले
उदास एक

पडला पाउस भिजले दोघे
एक न्हाईले
रडले एक

आला वारा हलले दोघे
एक खेळले
घाबरले एक

स्पर्शता त्याना नाजूक हातांनी
एक खुलले
गळले एक

पिकले जरी पानच होते
गाळता खाली
पाचोळा तेच

गाळता पान नवी पालवी
एक कोवळे
इवले एक



केदार....
  स्वप्नवेडा(गमन)
  http://marathikavita.co.in/index.php/topic,9165.new.html#new




मैत्रीण (गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,9050.0.html


केदार मेहेंदळे

 

  माझ्या गमन ह्या संग्रहात मी दोन गूढ कथा लिहिल्या आहेत. त्यातल्या पहिल्या कथेची लिंक खाली दिली आहे. आपला अभिप्राय अवश्य कळवावा  स्वप्नवेडा(गमन)
  http://marathikavita.co.in/index.php/topic,9165.new.html#new



Kalpesh Deore