स्वप्नवेडा(गमन)

Started by केदार मेहेंदळे, July 23, 2012, 03:15:58 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

28 May
मी विमनस्क आवस्थेत ऑफीस मध्ये बसलो होतो. रात्री निट झोप न लागल्याने माझ्या डोळ्यांची जळजळ होत होती. ह्या नवीन घरात आल्या पासून मला काहीबाही स्वप्न फारच पडायला लागली होती. कधी मजेदार तर कधी भयाण. त्या मुळे माझ्या झोपेच तर पार खोबरं झाल होतं. आज सुद्धा मी ऑफिस मधे बसल्या बसल्या काल रात्रीचं स्वप्न आठवत होतो. पण काही  केल्या मला ते निट आठवत न्हवतं. खरच, हि स्वप्न म्हणजे काय असेल? मी विचार केला. तसं पण मला काही काम न्हवतं आणि laptop  होताच. पटकन मी google  मारलं आणि स्वप्नांन बद्दल search  टाकला. माहितीचा महापूरच होता तिथे. मी आधाश्या सारखी ती माहिती वाचून काढली. म्हणजे मी एकटाच नाहीये तर  ज्याला विचित्र स्वप्नांचा अर्थ जाणून घ्यायचा आहे.  मी बरीच  माहिती वाचून काढली.

29 May
" अगं, आज मी स्वप्नां बद्दल वाचलं. तुला माहितेय, स्वप्नांवर किती research  चाललंय ते ?" सकाळी चहा घेता घेता मी बायकोला म्हणालो. "तुला माहितेय? एक lucid dreaming म्हणून प्रकार आहे. त्यात स्वप्न बघताना  आपण हे स्वप्न बघतोय हे अस लक्षात ठेवायचं असतं" मी म्हणालो.
"काही तरी काय. आहो आपण हे स्वप्न बघतोय हे लक्षात आलं तर स्वप्न संपणार नाही का?" हि हसत हसत म्हणाली.
"नाही. ते एक स्किल आहे. तुला माहितेय, 90% लोकांना स्वप्न आठवतं नाहीत. पण प्रत्येक सजीवाला रोज स्वप्न पडतात. इंटरनेट वर मी वाचलंय. जर कोणी म्हणत असेल कि त्याला स्वप्न पडतच नाहीत तर ते चूक असतं. त्याला स्वप्न पडलेलं असतं पण ते त्याला आठवतं नसतं इतकंच. आणि हाच स्वप्नांन वरील संशोधनात असलेला मोठा अडथळा आहे. त्या करता पडलेलं स्वप्न लगेच लिहून काढायचं म्हणजे ते विसरायला होत नाही."

"काही तरी काय. इथे मरणाची झोप येत असते, ती सोडून कोण लिहित बसणार." हि म्हणाली
"मी लिहिणार. अगं मला जर रोज स्वप्न पडत असतील आणि मी ती लिहायला लागलो तर मला रोज एक कहाणी नाही का मिळणार. आणि खरच जर lucid dreaming करता येत असेल तर मला हवं तसं आणि हव ते मी स्वप्नात बघू शकीन."
"काही नको हा. उगाच काही तरी नाद लागायचा आणि भलतं सलतं काही होऊन बसायचं." हिनी नेहमी प्रमाणे मोडता घातला. पण मी ठरवलं. प्रयत्न करायला काय हरकत आहे?

3 June
"आहो! तुम्ही काय करताय हॉल मध्ये रात्रीचे?" हि अचानक येऊन म्हणाली. रात्रीचे दोन वाजले होते आणि मी नुकतच पडलेलं स्वप्न लिहित बसलो होतो. हिची झोपमोड होऊ नये म्हणून मी मुद्दाम हॉल मध्ये बसून स्वप्न लिहित होतो पण हिला नेमकी जाग आलीच.
"तू झोप, मी आलोच." मी म्हणालो. मला पडलेलं स्वप्नच इतकं विचित्र होतं कि ते लिहीलं नाही तर नंतर आपण विसरून जाऊ हे मला पक्क माहित होत. त्या स्वप्नातले एकेक बारकावे मी आठवून लिहित होतो. पण आता मी काही भाग विसरत चाललो होतो. स्वप्नात मी एका माणसाच्या मागे धावत होतो, स्वप्नाच्या शेवटी त्या माणसानी मागे वळून माझ्या कडे बघितलं होत आणि मी भयंकर घाबरलो होतो. पण का ते मला नीटसं आठवत न्हवत. तो माणूस माझ्या कडे बघून काही तरी बोलला होता. "येशील येशील" असं काही तरी. पण आता ते मला नीट आठवत न्हवत.
सकाळी उठल्यावर मी ते स्वप्न हिला वाचून दाखवलं. त्यातली भीतीची भावना मी नीट उतरवून काढायचा प्रयत्न केला होता. आणि त्यात मी बहुतेक पुरेसा यशस्वी झालो होतो.

" आहो! काय हे. असलं काही तरी करू नका न." हि म्हणाली. " मला भीती वाटते. काही तरी काय. उगाच स्वप्न काय लिहायची. आणि lucid dreaming काय. उगाच नाही त्या वाटेला जाऊ नका."
"अगं, त्यात काय घाबरायचं? मी वाचलंय इंटरनेट वर. स्वप्नात कोणी मरत नाही. म्हणजे स्वप्नातल्या बाकी सगळ्या जाणीवा जरी जागं झाल्यावर आपल्याला जाणवत असल्या तरी स्वप्नात एखादा मेला म्हणून खर्या आयुष्यातही तो मेला असं उदाहरण अजून तरी  सापडलं नाहीये." मी म्हणालो.
"अजून सापडलं नाहीये म्हणे. एखादा मेला जरी असेल तरी नंतर सांगायला तो थोडाच येणार आहे?" हि म्हणाली. "किती तरी जण झोपेत मारतात आणि डॉक्टर सांगत असतील hart attack आहे म्हणून. कोणाला कळणार आहे?"
"ह्यां! तू पण ना काही तरीच बोलतेस. कुठली गोष्ट कुठे नेतेस."
"असून दे. आहे मी भित्री. पण काय कराल ते नीट  विचार करून करा म्हणजे झालं." हिनी समारोप केला.
त्या नंतर मला तो नादच लागला. हा अनुभव खरच धमाल होता. मी तर रोज रात्री स्वप्न पाडावं आणि मला ते आठवावं म्हणून प्रयत्न सुरु केले. रोज नवीन स्वप्न. नंतर वाचताना सगळे हसायचे आणि मला  पण हसायला यायचं. स्वप्नात आपण काहीही करतो नाही? सगळी मजाच असते.

पण ह्या सगळ्या स्वप्नांत मला एक स्वप्न मात्र नेहमी अर्धवट पडायचं. त्यात बहुतेक मी खूप घाबरलेलो असायचो. आणि काही तरी न समजण्याचा प्रयत्न करत असायचो. काहीतरी भयंकर, पण निश्चित आणि अटळ सत्य आणि ते सुध्धा माझ्या बाबतीतलं. त्या स्वप्नाची मला भीती वाटायची आणि ते स्वप्न पडायला लागलं कि आपण जाग व्हावं असंपण मला वाटायचं आणि जागे न होता पुढे जाऊन काय होतंय ते बघाव असं पण वाटायचं. सुरवातीला मी सगळी स्वप्न वाचून दाखवत असे. पण माझ्या बायकोला वाटणारी भीती बघून नंतर मी हे स्वप्न वाचून दाखवणं बंद केलं. उगाच बायकोची आणि मुलाची बडबड कोण ऐकणार. पण एक मात्र खरं. सुरवातीला जरी मी घाबरलो होतो तरी हळू हळू मी त्या स्वप्नाची वाट बघायला लागलो होतो. आताशा ते स्वप्न पडायला लागलं कि मला समजायचं आणि मी भयंकर घाबरायचो. एक मात्र खरं. त्या स्वप्नात हळू हळू मी पुढे जात होतो आणि त्यात पुढे काय होणार ह्याची एक भीतीयुक्त उत्सुकता मला लागू राहिली होती. त्या स्वप्नातला अनुभव, मला होणार्या जाणीवा इतक्या खर्या असायच्या कि किती तरी वेळा मी जागा झालो तरी वास्तवाचं भानच यायचं नाही.

15 July
तो माझ्या समोर आला. अचानक. अंधारातून. त्याला चेहरा न्हवता. केवळ कोरे तोंड. त्यावर डोळे, नाक, कान, ओठ काही नाही. मी नेहमी सारखाच भयंकर घाबरलो.
"घाबरतोस कशाला? शेवटी ती तुझ्याच नावाची पेटी आहे आणि तुला तिकडेच यायचं आहे." 
त्यांनी मला जोरात, इतक जोरात हलवलं कि मी एकदम एका बाजूला कालान्डलो.
"साहेब! जरा नीट बसा ना." शेजारचा प्रवासी म्हणाला. म्हणजे मी ट्रेन मध्ये आहे तर. आणि मला झप्का लागला होता वाटतं. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. माझ्या आजूबाजूचे प्रवासी माझ्या कडे काळजिनी बघत होते. मी काही न बोलता शांत बसून राहिलो.

20 July
हे तेच स्वप्न. आता मी ते बरोबर ओळखायला लागलो आहे. मी अंगणातून त्या जुन्या घरात गेलो. तो परिसर आता माझ्या सरावाचा झाला होता. त्या घरात अंधार होता. बहुतेक आजू बाजूला काही माणसं वावरत होती पण ती मात्र मला दिसत न्हवती. एकच जाणीव मला आगदी प्रखर पणे जाणवत होती आणि ती म्हणजे संपूर्ण वातावरणात एक अनाकलनीय भीती भरून राहिली होती. भयंकर भीती. मी मनातून प्रचंड घाबरलो होतो. त्या खोलीत बरेच लाकडाचे मोठे मोठे खोके रचून ठेवले होते आणि प्रत्येक खोक्यावर कोणी कोणी बसले होते. त्या खोक्यां मध्ये नक्कीच काही तरी दडलय. पण काय ते बघायची हिम्मत माझ्यात न्हवती. इतक्यात त्यातला एक खोका उघडायला लागला. मी भयंकर घाबरलो आणि जीव खाऊन पळत सुटलो. त्यांनी मला पकडायच्या आत त्या भयंकर जागे पासून मला दूर दूर जायचं होत. मी जोरात पळत होतो. दमून माझ्या छातीचा भाता जोरजोरात वर खाली होत होता. पण ते माझ्या मागून येतच होते. शांत पणे चालत आणि विचित्र हसत. जणू माझी कीव करत असल्या प्रमाणे. मी आजून जोरात पाळायला लागलो. इतक्यात त्यातल्या एकानी मागून येऊन मला गाठलेच. माझे खांदे धरून त्यांनी मला जोरात हलवलं. मी घाबरून त्याच्या कडे बघितलं. पण त्या व्यक्तीला चेहराच न्हवता. नुस्त कोर तोंड.
"कुठे जाशील पळून. बोल. आजून किती पळणार आहेस. लक्षात ठेव. शेवटी इकडेच येणार आहेस. ओरडायला काय झालं? सांग, काय झालं ओरडायला.... आहो... आहो...
"सोड मला... सोड ... सोड...
"आहो जागे व्हा, उठाना... आहो .....'
हळू हळू तो चेहरा जाऊन त्या ठिकाणी माझ्या बायकोचा चेहरा दिसायला लागला. माझे खांदे धरून ती मला गदा गदा हलवत होती. आजून सुध्धा त्या स्वप्नातल्या माणसांनी धरलेल्या ठिकाणी त्याच्या नखान मुळे जखम झाल्या सारख्या वेदना मला होत होत्या.
"काय झालं? जागे झालात का?" माझ्या बायकोनी काळजिनी विचारलं.
ओह! म्हणजे ते स्वप्न होतं तर. मी हळू हळू भानावर आलो आणि उठून बसलो. नेहमी प्रमाणे एकदा मला वाटलं कि ताबडतोब हे स्वप्न लिहून काढावं. पण आज बाहेरच्या हॉल मध्ये जाण्याची हिम्मत माझ्यात न्हवती. मी बाजूच्या घड्याळात बघितल. Digital आकडे 3.३० वाजल्याचे दाखवत होते. मी तसाच थरथरत हिच्या कुशीत शिरलो.
२८ फेब
"माझं ऐकाल का? हा नाद सोडून द्या. काही करता काही व्हायचं." दुसर्या दिवशी चहा पिताना हि मला म्हणाली. सकाळच्या वातावरणात रात्रीच्या स्वप्नाचं भयाण पण कुठेच जाणवत न्हवतं.  आपण उगाच जरा जास्तच घाबरलो होतो वाटतं. माझ्या मनात आलं.
"काही नाही होतं गं. लिहायला तर आत्ता लागलो. स्वप्न तर पहिले पण पडायचीच कि." मी म्हणालो. हि काहीच बोलली नाही. "अगं. काही होत नाही. शेवटी ते स्वप्नाच तर आहे." पण हिचं काही समाधान झाल्याच दिसत न्हवत. मी पण तो विषय तेव्हड्या वरचं सोडून दिला आणि अंघोळीला गेलो.
23 July
पुन्हा तेच स्वप्न. पुन्हा मी त्या घरात आलो होतो. खरं तर मला तिथे यायचं न्हवतं. पण सगळे रस्ते जणू त्या एकाच ठिकाणी येऊन मिळत होते. शेवटी धाडस करून मी विचारल.
"कसले खोके आहेत हे? आणि तुम्ही कोण लोक आहात?"
ते सगळे हसायला लागले. "अरे! मरण काही सांगून येतं का?" त्यातला एकजण म्हणाला. "जेवढा घाबरून दूर जायला बघशील,  तेवढा लवकर आमच्यात येशील."
ते ऐकून मी भयंकर घाबरलो "अरे घाबरू नकोस. मारशील तेंव्हा तुला कळणार हि नाही.  एके दिवशी बाहेरून येशील तेंव्हा ह्या खोक्यात तूच झोपलेला दिसशील. कि संपल सगळं." ते सगळे परत हसायला लागले. त्या हसण्याच्या आवाजांनी मी भयंकर घाबरलो आणि त्यांच्या पासून दूर पाळायला लागलो. धाऊन धाऊन मी खूप दमलो तरी धावतच राहिलो. मला त्यांच्यात जायचं न्हवत. आजूबाजूच्या देखाव्यात सुध्धा काही तरी भयंकर भरून राहिलं होतं. म्हणून मी डोळे बंद करून जीव खाऊन धावत राहिलो.धावता धावता मी कड्याच्या टोकाला आलो हे मला कळलेच नाही. एक पाउल पुढे आणि मी खोल दरीत कोसळलो. कोसळताना मला त्यांचे शब्द आठवत होते. "आरे तुला कळणार हि नाही. जेवढा घाबरून दूर जायला बघशील तेवढा लवकर आमच्यात येशील."

थोड्या वेळानी मी त्या पेटीत होतो..... आता कसलीच भीती न्हवती....... मी पेटीचं झाकण बंद करून घेतल.....


...... सगळीकडे अंधार, मी नेहमी प्रमाणे डोळे मिटले आणि ते स्वप्न आठवायचा प्रयत्न करू लागलो. कितीतरी वेळ मी ते आठवत होतो. जसजसा वेळ जात होता तसतसे मला त्या स्वप्नातले बारकावे आठवायला लागले. ताबडतोब उठून ते लिहून काढायला हवे होते, पण काही केल्या आज माझ्या डोळ्या वरची झोप जाताच न्हवती. आजून काही वेळ पडून रहावं आणि आजून काही आठवतंय का ते पहाव म्हणून मी परत परत त्याच त्याच स्वप्नाची मनातल्या मनात उजळणी करत पडून राहिलो. किती वेळ गेला कुणास ठाऊक. बेडरूमचा पडदा बंद होता आणि आवारातली ट्युब हि  बंद झाली असावी त्यामुळे बेडरूम मध्ये नेहमी पेक्षा जास्त अंधार होता. पण त्या मुळे मला बरच वाटत होतं आणि स्वप्न आठवायला मदतच होत होती. म्हणून परत किती तरी वेळ मी तसाच पडून राहिलो. आता मी परत डोळे मिटले. मला परत त्या स्वप्नाचा शेवटचा भाग दिसत होता. किती वेळ कुणास ठावूक, मी जाग आणि झोपेच्या सीमेवर फिरत होतो आणि सारखा त्या स्वप्नाची उजळणी करत होतो. पण मला त्या स्वप्नाचा शेवट फक्त आठवत होता. आणि खरं सांगायचं तर त्या पेटीतून बाहेर येउच नये असं वाटत होत.

परत अंधार.... सगळ शांत... डोळ्यावरची झोप काही जात न्हवती..... मी महत प्रयासानी उठलो. एक मात्र खरं कि एवढे भयाण स्वप्न पडूनही आज माझी झोप व्यवस्थित झाली असावी कारण माझ अंग एकदम हल्क झालं होतं. सवयी प्रमाणे मी बाजूला वळून बघितलं. हि बहुतेक आज आधीच उठली होती. मी घाई घाईनि उठलो आणि बाथरूम मध्ये जाऊन तोंड धुवून बाहेरच्या खोलीत आलो. हि ओट्याशी उभी राहून डब्यांची तयारी करत होती.
"कधी उठलीस? मला तर कळलहीं नाही." मी म्हणालो. पण हिनं ऐकून न ऐकल्या सारखं केलं. काल झोपताना काही भांडण वगैरे झालं होतं का? मी मनाशीच विचार केला. हि दिसतेय हि किती थकल्या सारखी. चाळीशी काय पन्नाशीची वाटायला लागलीय.पण काय भांडण झालं असावं? माझा मुलगा हॉल मध्ये अभ्यास करत बसला होता. नेहमी प्रमाणे हॉलमध्ये फ्यान चालू होता. आज मला माझा मुलगा सुध्धा नेहमी पेक्षा मोठा दिसत होता. का आपलंच हल्ली लक्ष नाहीये घरा कडे?  मी मनातच विचार केला.
"तू का आज लवकर उठलास? आणि अंघोळ सुध्धा झाली? काय आहे काय विशेष?" मी मुलाला विचारले. पण तो सुध्धा काहीच बोलला नाही. हे काय? आज झालंय तरी काय? मी पुन्हा किचन मध्ये हिच्या कडे बघण्या करता मान वळवली. मी काही बोलणार इतक्यात मला मधल्या भिंतीवर काही तरी बदल जाणवला. काय बरं? मी परत नजर वळवून त्या भिंती कडे पाहिलं. भिंतीवर माझा मोठ्ठा फोटो लावला होता आणि त्यावर घातलेला हार आणि त्याच्या समोरची निरांजनाची वात  वार्यांनी  हलत होती.



केदार...

दोन पाने(गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,9098.0.html

कुणी तरी आहे तिथे(गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,9241.msg30346.html#msg30346


प्रशांत नागरगोजे

Lekh mast vatala....jabardast. Swapnat kadhkadhi ekhadi gost sapadate lhhayala pan mi durlaksh karto...aajpasun yavar vichar karnar.