प्रार्थना (गमन)

Started by केदार मेहेंदळे, August 06, 2012, 12:50:24 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 हे ज्ञात अज्ञाता, जगन्नायका
करुनी वंदन तव शक्तीला
मागणे इतकेच मागतो अदभूता
हात जोडूनी तुझ्या करणीला

जरी ना देशील मला हवे ते
द्यावे सर्व जे  मला योग्य ते
जरी न देशील भरपूर मला रे
जाणीवहि नसावी कमी असल्याचे

जरी ना केले उपकार कधी मी
नकोच घडवू अन्याय हातांनी
जरी ना हसवले मी कोणाही
कोणा न रडवो माझ्या करणीनी

ना दिलेस बलदंड शरीर जरी
नको करूस जीणे परावलंबी
असुदे प्रकृती सात्विक अशी
न पडो कधी गरज वैद्याची

जरी ना भाळले माझ्यावर कोणी
नसावेत मजला शत्रू कुणीही
येता मरण मज तव कृपेनी
यावे सर्वांच्या डोळ्यात पाणी

मरणही मजला यावे असे कि
झोपण्या मिटावे डोळे रात्री
अन येता जाग सकाळी
समजावे आलो दुसर्या जन्मासी

हे ज्ञात अज्ञाता, जगन्नायका
करुनी वंदन तव शक्तीला
मागणे इतकेच मागतो अदभूता
हात जोडूनी तुझ्या करणीला


केदार...

कुणी तरी आहे तिथे(गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,9241.0.html

वैराग्याचा मेळा(गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,7331.0.html

विक्रांत

#1
मरणही मजला यावे असे कि
झोपण्या मिटावे डोळे रात्री
अन येता जाग सकाळी
समजावे आलो दुसर्या जन्मासी


मी सुध्दा असेच मागायचो बाप्पाला .
आता मात्र वाटते मरणाला भेटून तर जायलाच हवे

कविता छान आहे