तो

Started by धनंजय आवाळे, April 08, 2015, 11:49:07 AM

Previous topic - Next topic

धनंजय आवाळे

तिथेच आहे नांगर त्याचा
तिथेच आहे तो दोर
गुंडाळून ज्याला गळ्याभोवती
गेला तो फासावर

राबराबला शेतामधूनी
हातावरती पडले चर
चूल त्याची थंड सदा
कधी न जेवला पोटभर

कधी अवकाळी कधी दुष्काळी
गारपीटीने केला कहर
पिके गेली रानामधली
कर्जाचा डोंगर डोईवर

झगडत होता आयुष्याशी
कोणास फुटला ना पाझर
मेल्यावर सरणावरती
ठेवी मदतीचे गाजर

मातीशी होते नाते
टिकवले त्याने जन्मभर
मिसळून गेला मातीमध्ये
अगतिकतेने मेल्यावर .


. . . . . . . . . . . . धनंजय