तुझ्या आठवणींचे क्षण...

Started by Sadhanaa, November 14, 2012, 10:45:00 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

तुझ्या आठवणींचे क्षण
              भोवती गोळा होत आहेत
वीणेच्या झंकारा प्रमाणे
              त्यातून स्वर निघत आहेत ।
खोल हृदयांत तुझ्या स्मृति
              उचंबळून येत आहेत
श्वासांच्या हिंदोळ्यांवर
              त्या झोंके घेत आहेत ।
पहाटेच्या कळ्यांप्रमाणे
              मनीं स्मृति उमलत आहेत
मंद मधूर गंध त्यांचा
              हवे मध्ये दरवळत आहेत ।
तारका स्मृतिंच्या
              हृदयांवरी  उगवत आहेत
तेजस्वी पणे चमकून त्या
             जीवनांस वाट दाखवीत आहेत ।।

रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/11/blog-post_9.html