क्षणभरच्या भेटी

Started by Sameer Nikam, November 16, 2012, 10:51:55 PM

Previous topic - Next topic

Sameer Nikam

क्षणभरच्या भेटी आपुल्या
अधून मधून होत होत्या
न कळत तुझ्या माझ्या  मनाला
एक मेकांत गुंतवत होत्या

अचानकच आपुले ते
ठरत असत  भेटायचे
भेटी गाटी झाल्यावर मात्र
डोळे होते फक्त बोलायचे

क्षणभर च्या भेटीत असे
डोळे खूप काही बोललेले
दोन मनाला होते
घट्ट त्यानेच  बांधलेले

प्रश्न जे मनात आपुल्या
घर करून बसायचे
क्षणभरच्या भेटीत नेमके
जाती राहून तेच विचारायचे

क्षणभरच्या भेटीत असे 
डोळ्यांनी  खूप काही व्यक्त केलेले 
शब्दान पेक्षा जास्त
त्यालाच होते महत्व  दिलेले 

क्षणभरच्या भेटीत असे
खूप काही सांगायचे
निमित्त होते ते
मनातील भावना मांडायचे

क्षणभरच्या भेटीसाठी असे
जीव आपुला आतुरलेला
दोघांच्याही जीवाला होता
भेटण्याचा ध्यास तो लागलेला

क्षणभरच्या  भेटीसाठी असे
जीव आपुला व्याकुळलेला
मन मात्र जुन्या भेटीच्या
आठवणीत असे गुंतलेला

ओंझळीत आपल्या मनाच्या
शब्दांच्या कोडी असे भरलेल्या
क्षणभरच्या भेटी नंतर
वेळ जाती त्या सोडवायला

समीर सु निकम