प्रेम करावे

Started by Mangesh Kocharekar, November 17, 2012, 09:33:44 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar


प्रेम करावे कुणी कुणावर ज्याची त्याची मर्जी
सहा फुटाचा सखा देखणा साजणी त्याची अर्धी

कुणा शोभते साडी मधली कुणा शोभे पंजाबी
कुणी घालतो विजार अर्धी कुणी गुंडाळे लुंगी
कुणा आवडे मोडर्ण   बेबी कुणा आवडे छबी   
कुणी म्हणे सखेस डार्लिंग कुणी म्हणे बॉबी
     पाहुनी चिकना चेहरा कुणी उगाच हरखुनी जाते
    कुणा आवडे पहिल्या नजरे म्हणुनी कवेत घेते
    कुणा आवडे स्लिम  लैला कुणा आवडे  स्वभाव  भोळा
    कुणा आवडे गडी रांगडा कुनापासंत सखा कोवळा
    भाळतो कुणी खुळ्या  अदेवर अन कुणी शपथेवर
   काळत  नाही प्रेमवीरा  कधी ? कसे?  सरले अंतर
कुणा आवडे छंद कुणाचा सीगार  पितो किती भराभर
कुणा आवडे केस संभार दाट  रुळती कसे पाठीवर
कुणा आवडे  गोरी मैना परी सावली त्याची रैना
श्वेत  धवल ते पाहुनी जोडे ऊगाच करती कुणी खुणा
प्रेमवीर हे असे  आगळे काय म्हणावे या वेड्यांना?
परी समाज सलाम करतो अशाच हिर-रांझ्यांना
                                                 मंगेश कोचरेकर 
   

केदार मेहेंदळे


Mangesh Kocharekar


bharati ghodekar