सलाम

Started by Mangesh Kocharekar, November 18, 2012, 01:46:21 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar


  सेनेच्या  जन्मापासून तुम्ही पहिले स्वप्न
  शिवराज्य महाराष्ट्री यावे म्हणूनच तुमचा यत्न
  त्यासाठी त्यांचा  होता कठोर हर -संभव प्रयत्न
     साहेबांचे भाषण म्हणजे धगधगते हिंदुत्व
     त्यांच्या शब्दातच नव्हे नजरेतही अस्तित्व
    इशारा म्हणजे शिवसैनिकांना विचाराचे मुलतत्व   
मुंबई महाराष्ट्रची नाही कुणाच्या बापाची
साहेबांची वाणी उभ्या -आडव्या मापाची
शब्दांना धार होती अस्त्राच्या धाकाची
     त्यांच्या शब्दांनी जिंकून घेतलं मराठी मन
    महाराष्ट्रात सामना म्हणजे तत्वाचा हिंदवी घण
   स्वाभिमान जागृत ठेवून शिवजयंती झाला सण
म्हणूनच त्यांनी केल मराठी मनावर राज्य
त्यांच्या एका हाकेला होते लाखो सैनिक सज्ज्य
त्यांचा प्रेरणेन निपजतील शूरवीर अब्ज -अब्ज
    साऱ्या मराठी मुलखाला तुमचा अभिमान
  भगवा ध्वज म्हणजे स्वराज्याची शान
,मराठमोळ्या सेनेच्या राजा माझा तुला सलाम
                                   मंगेश कोचरेकर                     

केदार मेहेंदळे