बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली

Started by विक्रांत, November 18, 2012, 02:55:33 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

बाळ ठाकरे नावाच तुफान
आता शांत झाले आहे
त्या निरवतेत प्रत्येक मन
आज गहिवरून आले आहे
शब्दांच्या कडकडाटात उसळणारे
भावनांच्या झंझावातात गदगदणारे
प्रत्येक लढाऊ गलबत आज
सुन्न होऊन बसले आहे
तो आवाज चिंधड्या उडवणारा
तो स्वर मित्र मिळवणारा
तो स्पष्ट घट्ट रोकठोक
टणत्कार गांडीव धनुष्याचा
आता विराम पावला आहे
हे माझ्या विद्ध मराठी मना !
तुटला जरी दोर तरीही
लढणे तुला प्राप्त आहे
चल उचल तो भगवा
तख्त दिल्लीचे, जिंकायचे आहे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

केदार मेहेंदळे





मिलिंद कुंभारे

छान आहे कविता!

चल उचल तो भगवा
तख्त दिल्लीचे, जिंकायचे आहे


विक्रांत

वर्ष उलटून गेलय तरीही 
घाव अजून सुकलाच नाही .
त्या पोकळीत हृदयाच्या
शोक अजून मिटलाच नाही .
फडफडणारा भव्य  भगवा
अजूनही हसलाच नाही .
त्या शब्दास्तव कान अधीर
विरह हा मिटलाच नाही .
मना सांगतो मीच माझ्या
रे  दु:ख तुझे बेकार नाही .
त्या दु:खाचा कडवट घोटच
दुसरा तुज आधार नाही

मिलिंद कुंभारे

वर्ष उलटून गेलय तरीही
घाव अजून सुकलाच नाही .
त्या पोकळीत हृदयाच्या
शोक अजून मिटलाच नाही .....

छान .....  :(

शिवाजी सांगळे

समस्त मराठी जणांची, मनांची साहेबांना श्रद्धांजली. जय महाराष्ट्र !!!!!
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९