एक वाघ गेला

Started by SANJAY M NIKUMBH, November 18, 2012, 10:33:05 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

एक वाघ गेला

एक वाघ गेला
आता हज्जार वाघ
निर्माण होण्याची गरज आहे
रात्र आहे वैऱ्याची
मराठी माणसा
आता जागे होण्याची वेळ आहे
हा वाघ होता
म्हणून मराठी माणसाला
अस्मिता लाभली होती
त्याच्या डरकाळीने
समस्त विरोधकांना
जरब बसवली होती
इतकी वर्षे मराठी माणूस
निर्धास्त होऊन
जगत होता
कारण या वाघाचा
दुष्मनांवर
सक्त पहारा होता
आता वेळ आलीय
मराठी माणसाने
मनाने एकत्र येण्याची
तीच आदरांजली असेलं
या वाघाच्या
आत्म्याच्या शांतीची
शत्रूतर वाट पाहत होते
या वाघाला
शांत होण्याची
पण आता खरी गरज असेलं
हज्जार वाघ
निर्माण होण्याची
नाहीतर मराठी माणूस
या महाराष्टात
गुलाम होऊन जाईल
न या वाघाचं कार्य
इतिहास होऊन
मातीमोल होऊन जाईल
म्हणून प्रत्येक मराठी माणसानं
वाघासारखी
डरकाळी फोडावी
जी वाट दाखवलीय
या वाघानं
ती वाट चोखाळावी .

{ मा. बाळासाहेब ठाकरे यांना मनापासून आदरांजली .}
संजय एम निकुंभ , वसई दि. १७.११.१२ वेळ: ७.४५ सं .