बाळासाहेबांचा आत्मा

Started by SANJAY M NIKUMBH, November 18, 2012, 10:45:27 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

बाळासाहेबांचा आत्मा

अरे ! नका तुम्ही रडू असे
मग मी जावयाचे कसे
मागे ठेवून गेलोय मी
माझ्या कार्याचे ठसे
माझ्या विचारांची पताका
फडकत तुम्ही ठेवा
तुमचे प्रेम माझ्या
हृदयी आहे वसे
मी मनाने होतो खंबीर
पण देहाने झिजलो होतो
त्राण नसलेला देह घेवून
मी जगायचे तरी कसे
तुम्हांस वाटते नां
मी जवळ रहावे
नवीन देह धारण करुनी
पुन्हा येणार असे
मराठी न हिंदू माणसाच्या
मनात मी घर केले
राहीन तुमच्या हृदयात
मज काळजी नसे
हा वसा असाच तुम्ही
पुढे चालवत ठेवा
मी येणारच आहे
मराठी जन्म घेऊन नवा
तुम्ही रडतं बसलात तर
मी जायचे तरी कसे
न नवीन रूप धारण करून
मी यायचे तरी कसे
हा शोक आवरा आता
शिवबाचे राज्य सांभाळा
मराठे शूर तुम्ही सरदार
हे तुम्हीच विसरायचे कसे !

{ मा. बाळासाहेब ठाकरेंना भावपूर्ण श्रद्धांजली }
संजय एम निकुंभ , वसई
दि १७.११.१२ वेळ : १०.३० रा.

केदार मेहेंदळे


Lenindra Jambhulkar

Agadi barobar aahe, balasaheb aaplya amdhe nasale tari ttyanchi aatma sadaiv marathi mansamadhe rahil...