वसे तो कायम जन हृदयांत... बाळासाहेब ठाकरे

Started by Sadhanaa, November 19, 2012, 02:37:12 PM

Previous topic - Next topic

Sadhanaa

आज उगविला दिन काळा
झाकाळून गेले आभाळ
येऊ नये अशी आली
महाराष्ट्रावर अघोर वेळ ।

रंग केशरी भगव्याचा
मराठी मनावर फडकलेला
सोडुन गेला रसिक त्याचा
म्हणूनि तो  शुष्क जाहला ।

होता नेता वाघ आमुचा
कंठमनी सार्या महाराष्ट्राचा
घटकापळे मोजीत होता
झगडा जीवन-मृत्युचा ।

अखेर विझली ज्योत तयाची
दुपारच्या त्या काळ्या प्रहरी
हाहाःकार जगतात  पसरला
धांवली जनता वेडा लहरी ।

भान हरपले जनतेचे  अन
सोसवेना धरणीसही ताण
हमक्यावर तिज येती हमके
दुःख माईना पोटी म्हणून ।

मार्ग दाविला उन्नतीचा 
जळुनि कायम कणाकणाने
विझली ती ज्योत मंगल
अन देश व्यापला अंधाराने ।

म्हणुन वाटते मन्मनाला
राहिला न त्राता कोणी
मराठा लढवय्या एकच होता
आतां न ऐकिल हाक कोणी ।

व्यथित अंतःकरणाने म्हणुनि
श्रद्धांजली मी त्यांस अर्पितो
येईल तो कंठमणी पुन्हां
ह्या आशेवर जीवन जगतो ।

अर्पितो श्रद्धांजली ही परि
सवाल उठतो एक मनांत
कसे मी म्हणु गेले हृदयसम्राट 
वसे तो कायम जन हृदयांत   ।।
 
                                              रविंद्र बेंद्रे
Please click here to read
http://ravindrabendre.blogspot.com/2012/11/blog-post_19.html

Madhuri Gawde


kumar nikam

आज उगविला दिन काळा
झाकाळून गेले आभाळ
येऊ नये अशी आली

आज उगविला दिन काळा
झाकाळून गेले आभाळ
येऊ नये अशी आली
महाराष्ट्रावर अघोर वेळ ।

रंग केशरी भगव्याचा
मराठी मनावर फडकलेला
सोडुन गेला रसिक त्याचा
म्हणूनि तो  शुष्क जाहला ।

होता नेता वाघ आमुचा
कंठमनी सार्या महाराष्ट्राचा
घटकापळे मोजीत होता
झगडा जीवन-मृत्युचा ।

अखेर विझली ज्योत तयाची
दुपारच्या त्या काळ्या प्रहरी
हाहाःकार जगतात  पसरला
धांवली जनता वेडा लहरी ।

भान हरपले जनतेचे  अन
सोसवेना धरणीसही ताण
हमक्यावर तिज येती हमके
दुःख माईना पोटी म्हणून ।

मार्ग दाविला उन्नतीचा 
जळुनि कायम कणाकणाने
विझली ती ज्योत मंगल
अन देश व्यापला अंधाराने ।

म्हणुन वाटते मन्मनाला
राहिला न त्राता कोणी
मराठा लढवय्या एकच होता
आतां न ऐकिल हाक कोणी ।

व्यथित अंतःकरणाने म्हणुनि
श्रद्धांजली मी त्यांस अर्पितो
येईल तो कंठमणी पुन्हां
ह्या आशेवर जीवन जगतो ।

अर्पितो श्रद्धांजली ही परि
सवाल उठतो एक मनांत
कसे मी म्हणु गेले हृदयसम्राट 
वसे तो कायम जन हृदयांत   ।।
 
                                              रविंद्र बेंद्रे
Please click here to read
http://ravindrabendre.blogspot.com/2012/11/blog-post_19.html

महाराष्ट्रावर अघोर वेळ ।

रंग केशरी भगव्याचा
मराठी मनावर फडकलेला
सोडुन गेला रसिक त्याचा
म्हणूनि तो  शुष्क जाहला ।

होता नेता वाघ आमुचा
कंठमनी सार्या महाराष्ट्राचा
घटकापळे मोजीत होता
झगडा जीवन-मृत्युचा ।

अखेर विझली ज्योत तयाची
दुपारच्या त्या काळ्या प्रहरी
हाहाःकार जगतात  पसरला
धांवली जनता वेडा लहरी ।

भान हरपले जनतेचे  अन
सोसवेना धरणीसही ताण
हमक्यावर तिज येती हमके
दुःख माईना पोटी म्हणून ।

मार्ग दाविला उन्नतीचा 
जळुनि कायम कणाकणाने
विझली ती ज्योत मंगल
अन देश व्यापला अंधाराने ।

म्हणुन वाटते मन्मनाला
राहिला न त्राता कोणी
मराठा लढवय्या एकच होता
आतां न ऐकिल हाक कोणी ।

व्यथित अंतःकरणाने म्हणुनि
श्रद्धांजली मी त्यांस अर्पितो
येईल तो कंठमणी पुन्हां
ह्या आशेवर जीवन जगतो ।

अर्पितो श्रद्धांजली ही परि
सवाल उठतो एक मनांत
कसे मी म्हणु गेले हृदयसम्राट 
वसे तो कायम जन हृदयांत   ।।[/size] 
                                              रविंद्र बेंद्रे