मित्र

Started by केदार मेहेंदळे, November 20, 2012, 05:14:32 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

मित्राला दिलेले पैसे
परत कधीच मागायचे नसतात
कारण मागितले तरी तो
....................................पैसे परत देत नाही

मित्रानि पिताना दिलेला शब्द
लक्षात कधी ठेवायचा नसतो
कारण आठवणं करून दिली तरी तो
.................................... विश्वास काही ठेवत नाही

मित्राचा नको त्या वेळी आलेला फोन
डीसकनेक्ट करायचा नसतो
कारण डीसकनेक्ट केला तरी तो
.................................... घरी येणं टळत नाही

मित्राला दिलेली गाडी
पेट्रोल  भरल्या शिवाय चालवायची  नसते
कारण टाकी रिकामी झाल्या शिवाय तो
.................................... गाडी परत देतच नाही

मित्राला काही झाल तरी
गर्ल फ्रेंड चा नंबर देता येत नाही
कारण काही झालं तरी तो
....................................तिला फोन केल्या शिवाय रहात नाही

मित्राचा राग आला तरी
त्याला सोडता येत नाही
कारण दुख्खात असू आपण तेंव्हा तो
....................................एकट आपल्याला  सोडत नाही

मित्र नको असला तरी त्याला
सोडून पुढे  जाता येत नाही
कारण जर हरवला तर तो
....................................आयुष्यात पुन्हा मिळत नाही.

  केदार....

Shrikant R. Deshmane

agadi barobar...
khup chan... :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Shanky_4788


BABU BISLERI


BABU BISLERI


Datta mutthe


sagar khandale


anildgawali


PRASAD NADKARNI


Jayshri mankar

         Ek Friend Circle
मलाही वाटत माझही एक friend circle असाव
एकमेकांशी रुसण, फुगण आणि परत समजुत घालणार
दिवसभराची कटकट संपवून शेवटी एकमेकांशी  problem share करणार
खरच माझही एक friend circle असाव

कधीकधी  मित्रांच्या जिवावर पार्टी करणार
तर कधीकधी मित्रांसाठी जिव देणार
future plan नसतानाही  त्यावर भलमोठ lecture देणार
माझही एक friend circle असाव

आमचाही एक कटृटा असावा,एक gang असावी
कोणी खचत असेल  तर धीर देणार
कधीकधी पायामध्ये पाय घालून खाली पाडणार
पण त्याक्षणी हात पकडणार
माझही एक friend circle असाव

जरी life मध्ये दूर गेलो तरी
एकमेकांना miss करणार
भेटता जरी येणार नसेल
तरी फक्त भेटण्यासाठी plan बनविणार
माझही एक friend circle असाव.           
                    Jayshri Mankar.