मानव जेव्हां जन्मा येतो ...

Started by Sadhanaa, November 21, 2012, 08:58:30 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

मानव जेव्हां जन्मा येतो ...

मानव जेव्हां जन्मा येतो
नऊ मास आधीं सूचना देतो
जीवनांतून जाताना मात्र
क्षणांतच तो निघून जातो
मनुष्य जेव्हां जन्मा येतो
दोनच नाती जोडून येतो
अन तो जातो तेव्हां मात्र
अनेक नातीं तोडून जातो
जन्मेलेल्या जीवा बरोबर
आकांक्षांना ऊत येतो
पण एके दिवशीं क्षणांत तो
सर्व उधळून निघून जातो
घातचक्र हें ठाऊक असून
मनुष्य जीवन गणित मांडतो
अन हातचा विसरल्यामुळे
गणित सारे चुकवून बसतो
जीवनाचे कटु सत्य हें
मनुष्य भोंवती बघत असतो
तरीही गणित मांडण्यासाठी
सदोदीत धडपडत असतो

रविंद्र बेंद्रे

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा
Please Click on this

http://ravindrabendre.blogspot.com/2012/11/blog-post_20.html

केदार मेहेंदळे