करमत कधीच नाही

Started by madhura, November 21, 2012, 06:32:30 PM

Previous topic - Next topic

madhura

डोळ्यातले सखीला समजत कधीच नाही
यौवन दिवे तनाचे खुलवत कधीच नाही

अपुल्यात व्यस्त हसणे अन बोलण्यात रुसणे
सांगू कसे मनाचे धजवत कधीच नाही

दरवळ असेच इरले फुलले नभात तारे
तू मंद स्तब्ध राती बिलगत कधीच नाही

ती झाड चंदनाचे अन मी भुजंग त्याचा
ती रोम रोम माझा भुलवत कधीच नाही .....

माझ्यात तूच आहे अन मी तुझ्यात आहे
मज एकट्यात आता करमत कधीच नाही
By : वराडे पु ग

amoul

माझ्यात तूच आहे अन मी तुझ्यात आहे
मज एकट्यात आता करमत कधीच नाही

khupach chhan

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]