माणसाच्या शोधात

Started by madhura, November 21, 2012, 06:40:08 PM

Previous topic - Next topic

madhura

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर
उभा राहून मी पाहतोय माझं भूत
माझं वर्तमान आणि माझं भविष्य .
कालपर्यंत मी रहात होतो गावात
तिथे प्रेम होतं,बंधुभाव होता
माणूस माणसाला विचारत होता
चारीकडे हिरवळ होती
स्वच्छ स्वच्छंद हवा होती
रानं होती ,रानमेवा होता
खळखळ वाहणारे झरे
सळसळणारी झाडं,
गोठ्यातली वासरं
शेतातली कणसं
माझ्यासारखीच घामाझोकळ झालेली
ढवळ्या-पवळ्याची जोडी
सारे सारे माझ्याशी बोलत होते
माझ्याशी हितगुज करीत होते
माझ्या सार्या सुख दुःखाचे
ते साथी होते
पण आज .........?
+ +
गाव माझा ओस झाला आहे
आता मी शहरात आलो आहे
फ्ल्याटच्या संस्कृतीत वाढून
मी स्वतःच 'फ्ल्याट ' झालो आहे !
माझ्या जाणिवा बधीर झाल्या आहेत
संवेदना संपल्या आहेत
शेजारधर्म कशाशी खातात मला माहित नाही
अहो,माझ्या शेजार्याचं नावही मला माहित नाही !
+ +
उठल्याबरोबर चाकरघाई सुरु होते
भराभर विधी उरकायचे
चार घास पोटात ढकलायचे
सात पंचेचाळीसच्या गाडीने ऑफिस गाठायचे
पाच वाजता फायली आडून जांभया देत देत
खुर्ची वरचं बुड उचलायचं
आणि एकदाचं घर गाठायचं
त्याचवेळी सौभाग्यवती ऑफिसातून आलेल्या असतात
त्या पण जाम 'टायर्ड' झालेल्या असतात
मग चहा कोणी करायचा यावरून
संगीत 'मानापमान ' सुरु होते !
आणि 'एकच प्याला ' ने त्याचा अंत होतो ! !
++++++++++
या,बघा आता माझ्या शहराच्या चित्राची
एक छोटीशी झलक ...............
अ ब ब ब ..! काय हे ! !
जिकडे तिकडे काँक्रीटची जंगलं !
सुसाट वेगाने धूर ओकत सुटलेले
कर्णकर्कश वाहनांचे कळप
त्यावर आरूढ झालेले
मस्तवाल रथी-महारथी !
"मिले धुर मेरा तुम्हारा ",म्हणत
वाहनांच्या धुरात आपला धुर मिळवणारे
कारखान्यांचे प्रचंड भोंगे
आकाश आणि धरतीच्या
मिलनाची आठवण करून देणाऱ्या
प्रसादान्समोर्च्या बकाल झोपडपट्ट्या
त्यात वळवळणारे क्षुद्र जीवजंतू
आणि सिमेंटच्या जंगलातील श्वापदं
आठवण करून देतात
"जीवो जीवस्य जीवनम",ह्या उक्तीची .
कुठे जीवनासाठी कालः सुरु आहे
तर कुठे संपत्तीच्या कलहात
जीवनाची आहुती पडते आहे
मोठे मासे शिरजोर आहेत
छोटे त्यांचे भक्ष होत आहेत
"पळा पळा कोण पुढे पळे तो "म्हणत
सारेच तुकड्यामागे पळत सुटले आहेत
+++++++++++
आणि माझा समाज ............
भ्रष्टाचारी अळ्यांनी पोखरून पोकळ केलेला
पक्षाघात झालेल्या रुग्णासारखा निर्जीव
व्याधींनी जर्जर ,निस्तेज
कुणी कुपोषणाने ग्रस्त
कुणी अती वजनाने त्रस्त
कुठे पडताहेत भेसळीचे बळी
तर कुठे उमलण्याआधीच
खुडली जात आहे कळी
आदर्शांचा अभाव
वस्तूंचे चढलेले भाव
शिक्षित दिशाहिनांच्या तांड्यानचे तांडव
लाज लज्जा विकून खाल्लेल्या
ललनांचे अंग प्रदर्शन
नित्य शय्या बदलणाऱ्या नेत्यांचे नग्ननर्तन
बघतो आहे माझा समाज
उघड्या डोळ्यांनी
निर्विकार ,थंड ,षंढ.
++++++++++
आज मी विज्ञानाचे पंख लेवून
चंद्र ,मंगळावर गेलो आहे
सार्या सृष्टीचा जणू
मालकच झाल्याच्या थाटात वावरतो आहे
सारी सुखे हात जोडून पुढे उभी आहेत
बंगला ,गाडी ,सोने ,चांदी
सारे सारे मिळाले आहे
पण ....पण .....
ह्या सार्या धावपळीत ,पळापळीत
मी माझा आत्माच हरवला आहे !
माझ्यातला माणूसच मी हरवला आहे ! !
उरलं आहे केवळ जड शरीर
जाणीवशून्य संवेदनाशून्य बधीर शरीर
होय ,होय मी झालो आहे
आता केवळ एक प्रेत !
चालणारं !,बोलणारं !
हसणारं ! खिदळणारं !
केवळ एक प्रेत !
गर्भावर ब्राम्हास्त्राचा प्रयोग करणाऱ्या अश्वत्थाम्याप्रमाणे
मी स्वतःच केला आहे अंत
माझ्यातल्या माणसाचा
आणि उद्या ...........?
उद्यापासून मी भटकणार आहे
मस्तकावरील ओळी जखम कुरवाळीत
माझ्या हरवलेल्या
आत्म्याच्या शोधात !
माझ्यातल्या हरवलेल्या
माणसाच्या शोधात ................!

By: अनिल शेंडे ,नागपूर



Ashok Borse

]एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर
उभा राहून मी पाहतोय माझं भूत
माझं वर्तमान आणि माझं भविष्य .
कालपर्यंत मी रहात होतो गावात
तिथे प्रेम होतं,बंधुभाव होता
माणूस माणसाला विचारत होता
चारीकडे हिरवळ होती
स्वच्छ स्वच्छंद हवा होती
रानं होती ,रानमेवा होता
खळखळ वाहणारे झरे
सळसळणारी झाडं,
गोठ्यातली वासरं
शेतातली कणसं
माझ्यासारखीच घामाझोकळ झालेली
ढवळ्या-पवळ्याची जोडी
सारे सारे माझ्याशी बोलत होते
माझ्याशी हितगुज करीत होते
माझ्या सार्या सुख दुःखाचे
ते साथी होते
पण आज .........?