आता तरी अवतर ना रे विठ्ठला

Started by शैलेश भोकरे, November 22, 2012, 07:25:01 PM

Previous topic - Next topic

शैलेश भोकरे

कलीचा  प्रभाव तीव्र जाहला
तुझ्या अस्तित्वावर माणूस  प्रश्नांची रास उभारू लागला
आता तरी अवतर ना रे विठ्ठला....

असा कसा रे पेच उद्भवला
माणसाच्या रक्ताचा माणूस भुकेला इथे जाहला
आता तरी अवतर ना रे विठ्ठला....

धर्माचा अभिमान नुरला
पापात्म्यांचा उद्भव आणि पुण्यात्मांचा ह्रास कसा जाहला
आता तरी अवतर ना रे विठ्ठला....

समाज विभक्त होऊ लागला
प्राण्याचा माणूस आणि माणसाचा प्राणी पुन्हा जाहला
आता तरी अवतर ना रे विठ्ठला....

पामराचा भाव हृदयी दाटला
तुझ्या चरणकमलांचा ध्यास मनी लागला
आता तरी अवतर ना रे विठ्ठला....                             :शैलेश भोकरे

madhura

Namaskar Shailesh, apratim kavita ahe..he va baki sections madhye post keleya sudhha...