मुंगीन केल प्रेम

Started by Mangesh Kocharekar, November 23, 2012, 11:38:39 AM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar

         मुंगीन केल प्रेम
   एकदा एका मुंगीन भून्ग्यावर प्रेम  केल
   भुंग्यान प्रेमाखातर तिला पाठीवरून न्हेल
      भुंगा फुलावर बागडत होता मुंगी ऐटीत नाचत होती
     भुंगा मध खातांना ती नुसतीच पाहत होती
  मुंगीला साखरेची गोणी दिसताच तिने खाली उडी मारली
  उंची खूप होती म्हणून ती साखरेवर धडपडली
      भुंगा तिला जवळ घेत म्हणाला चाल तुला मध देतो
      फुलांच्या पक्ल्याचा झुला करून हवेत झोका देतो
  मुंगी ऐटीत म्हणाली मी प्रयत्नान पोट भरीन
तुझ्या कमाईच खाण्या ऐवजी मी वारुळाचा रस्ता धरेन
      मुंगी वाटेला लागली आणि उशिरानेच घरी पोचली
     बाबा रागावून  म्हणाले दिवसभर तू कुठे उलथली
मुंगी रडतच  म्हणाली चुकून मी भून्ग्यावर केल प्रेम
आत्ता कळल कोणत्याच नराच नसतो नेम
       आई रागवत म्हणाली उगाचच पाहू नये स्वप्न
      मुंग्यांच्या राज्यात प्रयत्न हाच ईश्वर तोच यत्न
तेव्हापासून मुंगी शहाणपण शिकली
कामातच मग्न पण प्रेमात नाही अडकली
      लोक तिला म्हणू लागले कामकरी मुंगी
     प्रयत्नशील माणसाने खोट्या मोहात पडू नये कधी
                                         
                                     मंगेश कोचरेकर