प्रत्येक जण आपल्या जीवनात कवी असतो..

Started by Mandar Bapat, November 23, 2012, 12:13:18 PM

Previous topic - Next topic

Mandar Bapat

प्रत्येक जण आपल्या  जीवनात कवी असतो..

जसा रात्री चंद्र अन  दिवसा रवी असतो

तसा प्रत्येक जण कधीनकधी जीवनात कवी असतो..



सुख दुखाचा वाटा सगळ्यांना सारखाच असतो..

दुखाच्या अंती सुखाचे यमक जोडतच  असतो..

कधी भुताच्या अश्रुनी वर्तमानाचे कागद ओले करतो

तर कधी सुखाच्या लेखणीने तिथेच रेघोट्या ओढतो

पण जीवनरुपी ओळ तो स्वछंदपणे  पूर्ण करतो..

कारण प्रत्येक जण आपल्या  जीवनात कवी असतो..



कधी डोळ्यात पाण्याचा डोह वाहत असतो

तर कधी आनंदात खगासोबत   गाणे गातो

कळत नकळत आयुष्याचा कंटाळा येतो

मग आठवणीचा घोट घेऊन पुन्हा उत्साहित होतो

पण जीवनरुपी ओळ तो स्वछंदपणे  पूर्ण करतो..

कारण प्रत्येक जण आपल्या  जीवनात कवी असतो..


ती व्यक्ती माझी म्हणून बोट ठेवतो

पण कोणी दुसरी व्यक्ती तिची हे तो विसरतो

मग पुन्हा नशिबाला शिव्या देतो

दूर राहायचे म्हणून एकांतवास सोसत राहतो

पण जीवनरुपी ओळ तो स्वछंदपणे  पूर्ण करतो..

कारण प्रत्येक जण आपल्या  जीवनात कवी असतो



प्रेम दुसऱ्यावर पण लग्न तिसऱ्यासोबत  करतो

काही दिवसांनी तिचावर पण प्रेम करू लागतो

डगमगणाऱ्या चाकाला  अजून एका चाकाचा आधार देतो

कधी हसत  तर कधी रडत संसार करतो

पण जीवनरुपी ओळ तो स्वछंदपणे  पूर्ण करतो..

कारण प्रत्येक जण आपल्या  जीवनात कवी असतो



आता आयुष्याचा bonus म्हणून काही दिवस काढतो

खोट्या बत्तीशी ने खोटे हास्य दर्शवतो

आयुष्यभर केलेल्या जीवनरुपी  कवितेचा आढावा घेतो

अन शेवट म्हणून एक पूर्णविराम देतो 

पण जीवनरुपी ओळ तो स्वछंदपणे  पूर्ण करतो..

कारण प्रत्येक जण आपल्या  जीवनात कवी असतो



जसा रात्री चंद्र अन  दिवसा रवी असतो

तसा प्रत्येक जण कधीनकधी जीवनात कवी असतो

                                                                                             .........मंदार बापट

Sagar Deshmukh


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]




विक्रांत

कविता छान आहे पण दीर्घ फार आहे .कमीत कमी शब्दात अधिकाधिक देता आले तर पहा. :)

Mandar Bapat