आई..

Started by कन्हैया माटोले, November 23, 2012, 01:42:21 PM

Previous topic - Next topic
माझ्या हृदयात तू
माझ्या वाणीत तू
माझ्या शब्दात तू 
शब्दातील सारात तू

किती निर्मळ तू
किती सुंदर तू 
किती स्वावलंबी तू
किती परोपकारी तू 

किती उदार तू
घेत नाही माघार तू
किती जिद्दी तू
किती आत्मविश्वासु तू

देवांच्या रुपात अवतरली तू
संतांची अमृतवाणी तू
बुडणाऱ्यास सदा तरते तू
चुकणाऱ्यास मार्ग दाखवते तू

पौर्णिमेचा चंद्र तू
अमावस्येचा काळोख तू
शुद्ध स्वच्छ छाया तू
त्या छायेतील गारवा तू

मनाचे मंदिर तू
मनातील विचार तू
सुंदर सोनेरी फुल तू
त्या फुलाचा आधार तू

शांत  थंड झुळूक तू
मातीचा मंद  वास तू
गडगडणाऱ्या  नभात तू
शांत शांत सारीतेत तू

किरणांचा शीतल प्रकाश तू
स्वच्छ निरभ्र आकाश तू
अनंत ब्रम्हांडात तू
रेणू पेक्षा लहान तू

काजवांची रेघ तू
फुलातील पराग तू
जगण्याचा आधार तू 
अशी माझी सुंदर "आई" तू


माझ्या आईसाठी अर्पण...

Datta Taur



vijay k tangade