कोळीष्टकं

Started by केदार मेहेंदळे, November 23, 2012, 03:39:53 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

सिलिंग फ्यानवर
जमली कोळीष्टकं
........................"साफ करुया"
........................तुझा हट्ट 

झटकता कुंच्यांनी
चिकटली सिलिंगला
........................"बघितलंत आता!
........................कठीण काढायला"

मनात आठवलं
अचानक मला
........................वागणं माझं
........................चुका माझ्या

मी निष्ठुर
फटकारत राहिलो
........................शब्दांच्या कुंच्यांनी 
........................नेहमीच तुला

तू तरीही
धरून मला
........................जळमटा  सारखी
........................चिकटून मला

वाईट वाटतं
आता आठवून
........................काय मिळवलं
........................तुला दुखावून

"डोळ्यांत पाणी?"
"कुठे काय?!
........................असेल कचरा
........................दुसरं काय?"


केदार...


विक्रांत

"डोळ्यांत पाणी?"
"कुठे काय?!
........................असेल कचरा
........................दुसरं काय?

मनास भिडली .