कवी म्हणून लोकांसमोर उभा ठाकतो

Started by Mandar Bapat, November 23, 2012, 05:04:27 PM

Previous topic - Next topic

Mandar Bapat

आजही कोणी हाक मारली कि वाटते तू आली
कालच्या वादळानंतर पुन्हा कोवळी झुळूक तू झाली
कालही वाद झाला तो आपल्या प्रेमासाठी
पण तू तर माझी साथ सोडली  त्याचा हातासाठी......

रात्र होती कालची थोडी  मोठी
मनात मात्र तुझ्या  आठवणीची दाटी
तोंड नव्हती पाहणार म्हणून बसलो लपून
ठेवले आहे प्रेम तिथे तेवढेच जपून .......

अंधारी आहे खोली पण प्रकाश नाही हसत 
डोळे आतुर आहे पण तू नाही दिसत
जगणे झाले कठीण पण मी जगणार
तुझे हे वागणे जगासमोर ठेवणार......

मांडेल माझे म्हणणे ऐकतील सगळे
काय म्हणू तुला मज हे न कळे
ठेवले हृदय समोर तर तुडवले त्याला
माझे तर प्रेम कधी न कळले तुला...... 

जा जा काय समजशील तू
जे माझे केले तेच त्याचे करशील तू
मी तर सावरलो त्याला पण कळू दे
प्रेमभंगानंतर त्याला पण सावरू दे

लोकांचे काय जे सांगू ते ऐकतात
तुला योग्य मलाही बरोबर म्हणतात 
मी झालो स्थिर अन तुलाही विसरलो
कमनशिबी तू,तुला मी नाही मिळालो...

आज मी माझे मत लोकांपुढे मांडतो
प्रत्येक कवितेत तुला समोर ठेवतो
बोचत खूप पण हसून सामोरा जातो
अन कवी म्हणून लोकांसमोर उभा ठाकतो......
                                                                    ....मंदार बापट

Shrikant R. Deshmane

लोकांचे काय जे सांगू ते ऐकतात
तुला योग्य मलाही बरोबर म्हणतात
मी झालो स्थिर अन तुलाही विसरलो
कमनशिबी तू,तुला मी नाही मिळालो...

chan...
kavita aavadli..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]