बाप माझा...

Started by कन्हैया माटोले, November 23, 2012, 07:53:00 PM

Previous topic - Next topic
सकाळच्या स्वप्नात मी
बाप माझा शोधला
डोंगरा एवढ्या आसवांन सोबत
जीव त्यान टांगला

रक्तपिपासू दुनियेत या
बाप माझा हरवला
अन जगन त्याच शोधतांना
कंठ त्याचा दाटला

माय माझी स्तब्धली
बापात माझ्या गुंतली
त्यालाच ती आठवतांना
तिचा किनारा वाहला

बाप माझा जगला
कि नुसताच गेला पोसला?
चांदण्यांच्या गर्दीत या
हसतांना त्याला पहिला

माणसांच्या गुंत्यात या
श्वास त्यान घेतला
रडण्यात हसनं शोधण्यासोबत
जीव त्यान टांगला
                    -कन्हैया माटोले


विक्रांत

कवितेतील दु;ख टोचत जरूर ,पण काही संदर्भ लागत नाही .गेस कराव लागत
उदा.बाप माझा जगला कि नुसताच गेला पोसला? सकाळच्या स्वप्नात मी ,
रडण्यात हसनं शोधण्यासोबत जीव त्यान टांगला.

माय माझी स्तब्धली
बापात माझ्या गुंतली
त्यालाच ती आठवतांना
तिचा किनारा वाहला

आवडलेल्या ओळी