एक पौर्णिमा

Started by विक्रांत, November 23, 2012, 11:32:07 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


मिट्ट काळोखात वर आकाशात
पूर्णचंद्र झळकत होता .
पिवळा पांढरा रंग त्याचा
शुभ्र प्रकाश झिरपत होता .
मनात माझ्या खोल आत
काही जागवत फुलवत होता.
पाहता पाहता चंद्र नभात
मी मला सोडून दिले.
किरणांच्या झोक्यावर मग 
मी पण माझे हरवून गेले .
कुणास ठावूक किती वेळ 
मीच चंद्र झालो होतो.
प्रकाशात अन् स्वत:च्या
चिंब निथळत उभा होतो .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


केदार मेहेंदळे

#1
chan kavita

विक्रांत

धन्यवाद केदार .खर तर हि एक अनुभूती आहे .शब्द फार कमी पडतात