सांगना का असे घडावे?

Started by Shrikant R. Deshmane, November 24, 2012, 10:41:37 AM

Previous topic - Next topic

Shrikant R. Deshmane

सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

मी पाहता नभी मेघही सरावे
मेघाळलेल्या नभी क्षणात चांदणे खुलावे...
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

दिवसास माझे चित्त नसावे
रात्री स्वप्नांतही तूच दिसावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

सर्वच चेहऱ्यांत तुलाच पाहावे
तरी पुन्हा तुलाच स्मरावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

यातनांनी मनीचे रान भरावे
आसवांनी उरीचे बंध तुटावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे...
                                         ......unknown
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]