ते क्षण.. परके झाले...

Started by tejam.sunil@yahoo.com, November 24, 2012, 11:01:44 PM

Previous topic - Next topic

tejam.sunil@yahoo.com

ते क्षण..
   परके झाले...

निघून गेली ती वेळ
जे मी मिठीत तुझ्या असायचो
हसत खेळत का असेना
पण तुझ्या सहवासात जीवन जगायचो

का छळत होता ग तो उनाड वारा
भास तुझा द्यायचा
मिठीत तू नसताना हि
धुंद  तुझ्यामध्ये करायचा

तू दिलेल्या वचनांची
हि साक्ष रात्र देते
चंद्र तार्यांना एकत्र करून
डोळ्यात स्वप्न तुझेच दाखवते

हरवली आहे ती पाऊलवाट
सुंदर नात्यातली सहवासाची साथ
नकळत होणारा तुझा भास
अन तुझा नसतो हातात हाथ

आता परके झाले ते सारे क्षण..
जे कधी फक्त माझे होते..
अश्रू हि डोळ्यातून बाहेर येण्याअगोदर 
मनापासून ते घाबरत होते


@ सुनिल (tejam.sunil@yahoo.com)


Shrikant R. Deshmane

#2
हरवली आहे ती पाऊलवाट
सुंदर नात्यातली सहवासाची साथ
नकळत होणारा तुझा भास
अन तुझा नसतो हातात हाथ

आता परके झाले ते सारे क्षण..
जे कधी फक्त माझे होते..
अश्रू हि डोळ्यातून बाहेर येण्याअगोदर
मनापासून ते घाबरत होते

khup chan sunilji...
ashach chan chan kavita vachayla milot..
bst luck... :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Amey Sawant



मिलिंद कुंभारे

छान प्रयत्न आहे! असंच लिहित राहा!

मिलिंद कुंभारे  :) :) :)

Dayanand

Khup chan vatle manala tujhi kavita vachlyavr te kshan punha dolyasamor aale.....daya