गप्पा

Started by Mangesh Kocharekar, November 26, 2012, 03:04:52 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar

                गप्पा
नका मारू काका स्वातंत्र्याच्या गप्पा
आम्ही स्वातंत्र्य मिळवले मारू नका थापा
     समजू नका स्वताला स्वातंत्र्याचे दूत
     उतरून टाका मानेवरील स्वातंत्र्याचे भूत
फिरून पहा एकटे मगच तुम्हाला कळेल
कलाच शेंबड पोरही तुमचा कान पिळेल
      पेन्शन मधले काही पैसे क्लार्क भावू  गिळेल
     काही नोटा मिळाव्या म्हणून तुमचाच मुलगा छळेल
जोवर पैसे तुमच्या किशात तोवर सून पळेल
वाढत्या महागाईत सांगा कुठवर पेन्शन पुरेल
      गार्डनच्या बाकासाठी नित्य झुंबड उडेल
      शक्तिहीन तुम्ही आता जागा कशी मिळेल ?
कोणी कोणास मोजत नाही कुठे आहे स्वतःची ग्वाही
शिक्षण असून नोकरी नाही  घरातही थारा नाही
         स्वातंत्र्यासाठी तुरुंगात होतात सांगा काय मिळवलं
         शिक्षण स्वातंत्र्य आहे कोठे ते तर पैशांनी गिळल
पोटासाठी टीचभर अन्न आहे खर्च हमी ?
गरीबाच्या नावाखाली अन्न लुटतात डमी
        लाखांचे शहरात प्याकेज इथे रोजीची मारामार
        म्हणून इथे लोक घेतात व्यसनाचा आधार
गरि बापुडे अजून खातात सावकाराचा मार
लोकनेते उदघटन  करत सावरत बसतात गळ्यात हार
                                कोचरेकर मंगेश   

                         

केदार मेहेंदळे


Mangesh Kocharekar


Madhura Kulkarni

स्वातंत्र्याचा_अर्थ..........म्हणजे_परकीय_राजवटीपासून_सुटका_आणि_मला_वाटत_कि_स्वातंत्र्याचा_आणि_भ्रष्टाचाराचा_किव्हा_कलियुगातील_बिघडलेल्या_संस्कृतीचा_काही_संबंध_नाही.